शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शिराळशेठ यांचा उत्सव उत्साहात

By admin | Updated: August 3, 2014 01:11 IST

संजय जाधव, पैठण साडेतीन घटकेचा बादशहा म्हणून इतिहासात आपल्या दातृत्वाने अजरामर झालेल्या पैठण येथील शिराळशेठ यांचा महोत्सव श्रीयाळ षष्ठीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

संजय जाधव, पैठणसाडेतीन घटकेचा बादशहा म्हणून इतिहासात आपल्या दातृत्वाने अजरामर झालेल्या पैठण येथील शिराळशेठ यांचा महोत्सव श्रीयाळ षष्ठीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात पुणे व पैठण येथे हा लोकोत्सव साजरा करण्यात येतो. पैठण येथे या उत्साहास ६८ वर्षांची परंपरा असल्याचे या कार्यक्रमाचे संयोजक जयभवानी क्रीडा मंडळाच्या सदस्यांनीसांगितले.नागपंचमी व त्याला जोडून श्रीयाळ षष्ठी पैठण येथे मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते. नागपूजेचा महिमा पैठण परिसरात अनादि काळापासून आहे. शककर्ता शालिवाहन सम्राट हे नागवंशीय होते, तेव्हापासून त्यांच्या राजवाड्याच्या बाजूलाच गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागघाटावर नागपंचमी व पिठुंबरा परिसरात दुसऱ्या दिवशी श्रीयाळ षष्ठी साजरी करण्यात येत आहे. नागघाटावरील नाग देवता पुत्रदायिनी असल्याची धारणा असल्याने मोठ्या संख्येने महिलांनी नागदेवतेचे दर्शन घेऊन गोदावरी नदीत नौकाविहाराचा आनंद लुटला. शिराळशेठ महोत्सवात मोठ्या संख्येने महिला व पुरुषांनी शिराळशेठ यांच्या पुतळ्याचे दर्शन घेत पूजा-अर्चा केली. शहरात शिराळशेठ यांचा मातीचा पुतळा उभारण्यात आला होता. रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरू होता.कोण होते शिराळशेठ? पैठण येथे इतिहास प्रसिद्ध अनेक गर्भश्रीमंत सावकार होते. त्यातील शिराळशेठ हे एक होते. सन १८३२ मध्ये दक्षिण भारतात तीव्र दुष्काळ पडला होता. अन्न व पाणी यासाठी जीव गमावण्याची वेळ जनतेवर आली होती. व्यवसायाने सावकार; परंतु मनाने उदार असलेल्या शिराळशेठ यांनी स्वत:जवळ असलेल्या धान्यांची कोठारे गोरगरिबांना देण्याचा निर्णय घेऊन तो दक्षिण भारतात स्वखर्चाने वितरित केला व लाखो लोकांचा जीव वाचविला.तत्कालीन राजाने शिराळशेठ यांचे दातृत्व ओळखून त्यांना सत्काराचे निमंत्रण दिले व शिराळशेठ यांनी काहीही मागावे असे त्यांना सूचित केले. यावर धनदौलत न मागता शिराळशेठ यांनी साडेतीन घटकेसाठी मला राजा करा, अशी विनंती राजाकडे केली व ती मान्य करण्यात आली. साडेतीन घटकेचा राजा होताच शिराळशेठ यांनी गोरगरिबांच्या जमिनी त्यांना परत देण्याचा निर्णय घेतला. नाण्याचा शिक्का चामड्यावर मारून त्याचा पैशाच्या रूपात वापर करण्याचा निर्णय घेतला. शिराळशेठ यांच्या उपकाराचे विस्मरण होऊ नये म्हणून व दानशूर लोकांना प्रेरणा मिळावी, त्यांचा मानसन्मान व्हावा या हेतूने गेल्या ६८ वर्षांपासून पैठण-पुणे येथे हा लोकोत्सव साजरा होत आहे.श्रीयाळ षष्ठीनिमित्त हा उत्सव महाराष्ट्रात विविध ठिकाणी साजरा व्हायचा. औरंगाबादच्या गुलमंडी, खोकडपुरा, फकीरवाडी भागांत हा उत्सव साजरा होत होता. कालांतराने तो बंद पडला. पैठणमध्ये शिराळशेठ यांच्या मातीच्या प्रतिमा तयार करून हा उत्सव साजरा व्हायचा, आता फक्त पिठुंबरा गल्लीत हा उत्सव साजरा होतो.