लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहर व परिसरात २६ जून रोजी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील विविध भागात मुस्लिम बांधवांनी ईदुल फित्रची सामूहिक नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.नर्सी येथे ईद उत्साहातनर्सी नामदेव : एक महिन्याच्या पवित्र रमजान महिन्यानंतर २६ जून रोजी नर्सी येथे रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. नर्सी येथील ईदगाह मैदानावर सकाळी १०.३० वाजता मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची सामूहिक नमाज अदा केली. दरम्यान, यावेळी मौलाना काजी सदुरोद्दीन यांनी नमाज पठण केले. त्यापूर्वी त्यांनी रमजानबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच इस्लाम धर्माची शिकवण दिली. यावेळी गावातील सर्व मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर जमल्यानंतर त्यांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे हिंदू बांधवांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.रमजान ईद उत्साहातऔंढा नागनाथ : येथील ईदगाह मैदानावर सकाळी ९.३० वाजता येथील सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येवून नमाज पठण करून रमजान ईद उत्साहात साजरी केली. दरम्यान, ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी नगर पंचायतच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार पांडुरंग माचेवाड, नगराध्यक्षा दीपाली शरद पाटील, मुख्याधिकारी ज्योती भगत, वैजनाथ भालेराव, गणपत दराडे, शंकर शेळके, राम नागरे, सुमेश मुळे, विष्णू जाधव, अनिल देशमुख, गणेश देशमुख, मोतीराम राठोड, पांडुरंग पाटील, राजकुमार झांजरी, बाळू देशमुख, ब. ल. तामसकर, मुंजाजी, संदीप गोबाडे, नंदू पाटील, गजानन वाखरकर आदींनी मुस्लिम बांधवांची गळाभेट घेऊन त्यांना रमजान ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. दरम्यान, खा. अॅड. राजीव सातव, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. डॉ. संतोष टारफे यांनी मुस्लिम बांधवाच्या भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी
By admin | Updated: June 26, 2017 23:39 IST