शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

कोरोनाच्या सावटात रमजान ईद अत्यंत साधेपणाने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कडक उन्हाळ्यात तीस दिवस उपवास ठेवल्यानंतर मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी अत्यंत साधेपणाने ईद-उल्‌-फित्र साजरी केली. ईदची विशेष नमाज ...

औरंगाबाद : कडक उन्हाळ्यात तीस दिवस उपवास ठेवल्यानंतर मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी अत्यंत साधेपणाने ईद-उल्‌-फित्र साजरी केली. ईदची विशेष नमाज घरातच अदा करण्यात आली. प्रशासनाने कोरोनासंदर्भात ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. शहरातील पाच प्रमुख ईदगाहमध्ये दुसऱ्यावर्षीही ईदची नमाज झाली नाही.

मागीलवर्षी केंद्र शासनाने लावलेल्या कडक लॉकडाऊनमुळे मुस्लिम बांधवांना घराबाहेर पडता येत नव्हते. ३० देवास घरातच नमाज, इबादत करून ईद साजरी केली होती. यंदाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रमजान महिन्याचे आगमन झाले. मागीलवर्षीच्या तुलनेत सकाळी आणि सायंकाळी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी प्रशासनाने मुभा दिली होती. गुरुवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष नमाज अदा केली. शहरातील मशिदीमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिकांना परवानगी देण्यात आली नाही. ईदच्या नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी कब्रस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांच्या कबरीवर पुष्प अर्पण केले. कोरोना नियमांचे पालन करीत हस्तांदोलन आणि गळाभेट टाळण्यात आली. नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

ईदची खरेदी नाही

रमजान ईदला गरीब आणि श्रीमंत प्रत्येकजण सर्वच नवीन कपडे खरेदी करतात. मागीलवर्षी नागरिकांनी जुन्या कपड्यांवरच ईद साजरी केली. यंदाही ९० टक्के नागरिकांनी जुन्या कपड्यांवरच ईद साजरी केली. केवळ लहान मुलांच्या हट्टापायी, जिथे मिळतील तेथून त्यांना कपडे विकत आणण्यात आले.

कोरोनात मरण पावलेल्या कुटुंबांमध्ये ईद...

कोरोनामुळे ज्या कुटुंबातील सदस्य मरण पावला, त्या कुटुंबावर अगोदरच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरातील फारुकी कुटुंबीयांमध्ये चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण फारुकी कुटुंबामध्ये आज ईद साजरी झाली नाही, असे त्यांच्या कुटुंबातील सदस्य खालेद फारुकी यांनी सांगितले. शहरात अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांच्या घरातील एक तरी कर्ता पुरुष मरण पावला. त्या कुटुंबांमध्ये आज ईद साजरी झाली नाही.

शिरखुर्म्याची फक्त औपचारिकता

रमजान ईदचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरात शिरखुर्मा तयार करण्यात येतो. पण यावेळी कोरोनामुळे नागरिकांनी अत्यंत औपचारिक स्वरूपात शिरखुर्मा तयार करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षीच्या तुलनेत पन्नास टक्केच दूध नागरिकांनी खरेदी केले. रात्री आठनंतर पोलिसांनी दूध विक्रीवर बंदी आणली. त्यामुळे प्रत्येक दुकानदाराकडील किमान पाचशे ते सहाशे लिटर दूध खराब झाले.