प्रारंभी औरंगपुरा येथील फुले दांपत्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष वामन भागवत यांनी व महानगरपालिका प्रशासनातर्फे जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार यांनी फुले दांपत्यास पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात(घाटी)येथे जाऊन स्वेच्छेने रक्तदान केले. पुतळ्याजवळ ‘जय ज्योती, जय क्रांती, महात्मा जोतीराव फुले यांचा विजय असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.
जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, माजी नगरसेविका कीर्ती शिंदे, सुभद्रा जाधव, विजय महाजन, गणेश काळे, अनिल क्षीरसागर, चंद्रकांत पेहरकर, संदीप घोडके, निशांत पवार, योगेश हेकाडे, अभिजित जहागीरदार, संजय माळी, शिवाजी जाधव आदींची उपस्थिती होती.