प्रारंभी ग्रामपंचायत प्रशासक किशोर जगताप यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. संविधान म्हणजे काय, ते कोणी आणि कधी लिहिले याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बुद्धीचार्य प्रकाश जगताप, बाबूराव जगताप, विनायक काटकर, दिलीप जगताप, अमोल जगताप, शेषराव गुरुजी, सरफराज शेख, जितेंद्र जोगदंडे, आकाश गायकवाड, मातीन शेख, गजानन काळे, अमोल काळे, खन्ना जगताप आदींची उपस्थिती होती.
- कॅप्शन : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना प्रशासक किशोर जगताप, मतीन शेख आदी.