शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
3
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
5
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
6
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
7
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
8
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
9
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
10
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
11
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
12
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
13
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
14
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
15
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
16
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
17
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
18
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
19
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
20
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

सीसीटीव्ही कॅमेरे बंद

By admin | Updated: June 23, 2014 00:25 IST

भूम : मोठा गाजावजा करुन भूम शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी व कार्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले.

भूम : मोठा गाजावजा करुन भूम शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी व कार्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मात्र, भूमकरांना याबाबतीत ‘नव्याचे नऊ दिवस’ या म्हणीचा प्रत्यय आला आहे. हे कॅमेरे मागील तीन महिन्यांपासून बंद पडले आहेत. परिणामी यावर प्रशासनाने केलेला लाखो रूपयांचा खर्च अक्षरश: पाण्यात गेला आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या घटना, चोरांचा सुळसुळाट, महिलांच्या छेडछाडी आदी घटना डोळ्यासमोर ठेवून शहरातील बसस्थानक परिसर, गोलाई चौक, तहसील कार्यालय परिसर, पार्डी रोड या ठिकाणी तब्बल १ लाख ८० हजार रुपये खर्च करुन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. सुरुवातीचे काही दिवस हे कॅमेरे सुस्थितीत चालले. त्यामुळे गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांना बऱ्यापैकी आळाही बसला होता. मात्र मागील तीन महिन्यांपासून हे कॅमेरे बंद पडले असून, त्याच्या दुरूस्तीकडे अद्याप कुणीच लक्ष दिलेले नाही. परिणामी कॅमेरे बसविण्यावर झालेला पावणेदोन लाखावरचा खर्च सध्यातरी वायाच गेला असे म्हणावे लागेल. (वार्ताहर)ना पुढाऱ्यांना सोयरसुतक.. ना पोलिसांना...एकीकडे गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे केलेल्या उपाययोजनांकडे सपशेल कानाडोळा केला जात आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे सीसीटीव्हीच्या दुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष. लाखो रुपये खर्च करुन निर्माण करण्यात आलेली ही सुविधा आज अडगळीला पडली आहे. याचे ना पुढाऱ्यांना ना पोलिसांना सोयरसुतक आहे. शहरामध्ये सातत्याने वर्दळ असते. ग्रामीण भागातून शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्याही जास्त आहे. या संधीचा फायदा घेत, महिला, मुलींच्या छेडछाडीच्या घटना होऊ शकतात. त्यामुळे बंद पडलेले कॅमेरे सुरु करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.मागील तीन महिन्यांपासून कॅमेरे बंद पडले आहेत. त्यामुळे या परिसरात घडणाऱ्या घटनांचा तपास लावण्यात अडचणी येत असल्याचे पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पेमेंट थकल्याचे कारणज्या कंत्राटदारांनी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले याची काही रक्कम थकित आहे. त्यामुळे सदरील सीसीटीव्ही दुरुस्ती केली जात नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे या सीसीटीव्हीची दुरुस्ती करण्याऐवजी सर्व वायर गुंडाळून स्ट्रीट लाईटच्या खांबावर लटकविण्यात आले आहेत.