बीड : येथील विप्रनगर भागात घराकडे निघालेल्या व्यापाऱ्याची दुचाकी अडवून लुटल्याची घटना गुरूवारी घडली होती. या प्रकरणी दोन आरोपींच्या रात्रीतून मुसक्या आवळण्यात आल्या.महेश मारूती कसबे (रा. शाहूनगर, अंबिका चौक, बीड) , गणेश संजय गरड (रा. वडगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर, ह. मु. शाहूनगर, बीड) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे तीन साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.विप्रनगरातील व्यापारी बद्रीनारायण शंकरलाल झंवर यांचे जुन्या मोंढ्यात किराणा दुकान आहे. ते दुकान बंद करून घराकडे जात होते. विप्रनगरातील पुलाजवळ तिघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी झंवर यांची दुचाकी अडवत डोळ्यात मिरची पूड टाकत ७४ हजार ५०० रूपये काढून घेतले होते. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखा दरोडा प्रतिबंधक पथकाने तपास गतिमान केला.अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर अधीक्षक माधव कारभारी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी. डी. शेवगण, सहायक निरीक्षक भारत राऊत यांनी कारवाई केली. कर्मचाऱ्यांनी देखील परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
लूट प्रकरणी दोघांच्या आवळल्या मुसक्या
By admin | Updated: March 28, 2015 00:46 IST