शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

प्रथम वर्षाला कॅरिआॅन; एटीकेटीची मर्यादा वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 01:04 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाने अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना कॅरिआॅन देण्याचा निर्णय घेतला. तर द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या एटीकेटीची मर्यादा दहा टक्क्यांनी वाढविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाने अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना कॅरिआॅन देण्याचा निर्णय घेतला. तर द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या एटीकेटीची मर्यादा दहा टक्क्यांनी वाढविली आहे. या निर्णयासाठी एनएसयूआय, आरएसएफ या विद्यार्थी संघटनांनी सोमवारी दिवसभर प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने केली. शेवटी सायंकाळी या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर संघटनांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.विद्यापीठात मागील अनेक दिवसांपासून अभियांत्रिकीला कॅरिआॅन देण्याच्या मागणीसाठी आंदोलने करण्यात येत आहेत. लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाला (बाटू) संलग्न झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी कॅरिआॅन देण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी घेतला होता. मात्र, विद्यार्थी संघटनांच्या श्रेयवादाच्या लढाईत द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही कॅरिआॅन देण्याची मागणी पुढे आली. यात रिपब्लिकन स्टुडंटस् फेडरेशनने प्रथम वर्षाच्या कॅरिआॅन आणि द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या एटीकेटी मर्यादेत वाढ करण्याची मागणी केली होती. यानंतरही एनएसयूआयतर्फेही ही मागणी पुढे रेटण्यात आली. मात्र शनिवारी, रविवारी अभियांत्रिकीच्या प्राचार्यांच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे एनएसयूआय, आरएसएफ संघटनेतर्फे सोमवारी जोरदार निदर्शने करण्यात आली.या निदर्शनांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनीही तगडा बंदोबस्त लावला. यामुळे कुलगुरूंनी अधिष्ठाता, प्राचार्यांची पुन्हा सायंकाळी बैठक बोलावली. या बैठकीत केवळ ‘बाटू’च नव्हे तर अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरसकट कॅरिआॅन देण्याचा निर्णय घेतला. द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना एकूण विषयाच्या ५० टक्के विषयांपर्यंत एटीकेटी देण्यात येणार आहे. याविषयीची माहिती विद्यापीठ प्रशासनाने कळविली.