शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांची हेळसांड

By admin | Updated: June 26, 2014 00:34 IST

कडा: आष्टी तालुक्यातील कडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर अनेकदा गैरहजर असतात.

कडा: आष्टी तालुक्यातील कडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर अनेकदा गैरहजर असतात. यामुळे उपचारासाठी आणलेल्या जनावरांची हेळसांड होते. डॉक्टर नसल्याने उपचाराची भिस्त शिपायावरच असते.आष्टी तालुक्यातील कडा येथील जि.प. पशुसंवर्धन विभागांतर्गत असलेल्या पशुवैद्यकीय श्रेणी -१ चा दवाखाना आहे. या दवाखान्यांतर्गत डोंगरगण, केरूळ, शेरी, कडा या परिसरातील जनावरांवर उपचार करण्यात येतात. असे असले तरी या गावात लाळ्या, खुरकूत, लसीकरण आदी कामांसाठी डॉक्टर क्वचितच जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पशुपालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेकदा शेती मशागतीचे काम करीत असताना बैल जखमी होतात. अशा वेळी त्यांना कडा येथील दवाखान्यात आणण्यात येते. नेमके यावेळी दवाखान्यात डॉक्टर हजर नसल्याने पशुंवर शिपायांकडून उपचार करून घ्यावे लागतात. अनेकदा जनावरांना गंभीर इजा असल्यास किंवा इतर काही गंभीर आजार असल्यास वेळ प्रसंगी खाजगी डॉक्टरांचीही मदत घ्यावी लागते. यासाठी शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करण्याची मागणी सचिन वाघुले, दादा जगताप यांनी केली. या रूग्णालयात गेले असता उपस्थित असलेल्या शिपायाने सांगितले की, डॉक्टर रजेवर गेले आहेत. तर तालुका पशुधन अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता भ्रमणध्वनीवर संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)खाजगी डॉक्टरांकडून करावे लागतात उपचारकडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कडासह डोंगरगण, केरूळ, शेरी या भागातील पशुंवर केले जातात उपचार.अनेकदा दवाखान्यात डॉक्टर हजर नसल्याने शिपाईच करतो उपचार.पशुंना गंभीर इजा असल्यास खाजगी डॉक्टरांची घ्यावी लागते मदत.