शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कार उसाच्या ट्रॅक्टरला धडकली, ११ प्रवासी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:05 IST

हतनूर : धुळे-सोलापूर महामार्गावर हतनूरजवळ अतिशय वेगात आलेली कार उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडकल्याने भीषण अपघात झाला. कारमधील चालकासह अकरा ...

हतनूर : धुळे-सोलापूर महामार्गावर हतनूरजवळ अतिशय वेगात आलेली कार उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडकल्याने भीषण अपघात झाला. कारमधील चालकासह अकरा प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सिल्लोड तालुक्यातील पेंडगाव येथील काही लोक करंजगाव येथील नातेवाइकांच्या अंत्यविधीसाठी कारने (क्र. एम. एच. २०. डी. व्ही. २८३०) गेले होते. तेथील अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर कारने कन्नडच्या दिशेने पुन्हा परत निघाले. तेव्हा कन्नडच्या दिशेलाच जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून कारने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात कारच्या पुढील बाजूचा चुराडा झाला. कारमधील चालकासह अकरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना घडताच, हतनूर गावातील अनवर पठाण या तरुणाने त्याच्या स्वत:च्या मिनी टेम्पोतून हतनूर प्राथमिक रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी हतनूर गावातील तरुण मोठ्या संख्येने धावत आले. तरुणांनी काही जखमींना रुग्णवाहिकेतून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

जखमीत यांचा आहे समावेश

बेगुशहा, बिस्मिल्ला शहा, युनूस शहा, अब्दुल शहा, बनू शहा, शिल्पाबी शहा, बानुबी शहा, कुबराबी शहा, अमिनाबी शहा (सर्व रा. पेंडगाव, ता. सिल्लोड) व चालक भीमराव बोऱ्हाडे (रा. चारणेर) यांचा जखमींत समावेश आहे. जखमीमध्ये तीन जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याचे प्रथमदर्शनी लोकांनी सांगितले.