उमरगा : तालुक्यातील येळी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरूस्त ट्रकवर कारने जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारीरात्री एपी २०/ बीजे २३८६ क्रमांकाची कार हैदराबाद येथून मोहोळकडे जात होती. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील येळी गावानजीक एम.एच.१२ - एच.डी. ७३५४ या क्रमांकाचा ट्रक नादुरूस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता. भरधाव वेगाने निघालेली ही कार थेट ट्रकवर जावून आदळली. यात कारमधील चंद्रशेखर राममोहन रामशेट्टी (वय ५५ वर्ष, रा. राकटाऊन हैद्राबाद) हे जागीच ठार झाले तर नसरोद्दीन मोहमद (वय ४५, रा. हैदराबाद) हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला हालवण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार असून, मयताची बहिण लक्ष्मीभास्कर राममोहन रामशेट्टी यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरोधात उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोउपनि बापू कांबळे करीत आहेत.
नादुरुस्त ट्रकवर कार आदळली
By admin | Updated: July 18, 2016 01:04 IST