शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजकावर कार धडकून तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:03 IST

औरंगाबाद : भरधाव कारचे टायर फुटल्याने ती दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात तरुण ठार झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी ...

औरंगाबाद : भरधाव कारचे टायर फुटल्याने ती दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात तरुण ठार झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री सिडकोतील आंबेडकर चौकात झाला. सय्यद आवेज सय्यद अहमद (३२, रा. नारेगाव ) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर ऐजाज हा जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आवेज आणि ऐजाज हे दोघेही कारने मंगळवारी रात्री १२.३० वाजता जळगाव रोडने जात होते. यावेळी सिडकोतील आंबेडकर चौकाजवळ कारचे टायर फुटल्याने ऐजाजचे कारवरील नियंत्रण सुटले. कार दोन ते तीन पलटी मारून दुभाजकावर आदळली. त्यामुळे आवेज आणि ऐजाज हे गंभीर जखमी झाले. त्यांना हेल्प रायडर्स ग्रुपचे शुभम गुप्ता व भीमा धर्मे यांनी नागरिकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, आवेजची प्रकृती जास्त बिघडल्याने त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा पहाटे २.१५ वाजता त्याचा मृत्यू झाला. ऐजाज व आवेज दोघे कोठे जात होते, हे नातेवाईकांना माहिती नाही. सय्यद आवेजचे नारेगाव येथे मोबाईलचे दुकान आहे. तो विवाहित असून, त्याला नऊ महिन्यांचा मुलगा आहे.

याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.