शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

औरंगाबादचा अंकित भारत अ संघाचा कॅप्टन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:46 IST

वर्षानुवर्षे खोºयाने धावा फटकावत कमालीचे सातत्य राखणारा महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे हा धर्मशाळा येथे ४ ते ८ मार्चदरम्यान होणाºया देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत अ संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.

औरंगाबाद : वर्षानुवर्षे खोºयाने धावा फटकावत कमालीचे सातत्य राखणारा महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे हा धर्मशाळा येथे ४ ते ८ मार्चदरम्यान होणाºया देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत अ संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.मंगळवारी नवी दिल्ली येथे जाहीर झालेल्या भारत ब संघात अंकित बावणेचा समावेश करण्यात आला होता व आर. आश्विन याच्यावर भारत अ संघाच्या कर्णधारपदाची धुरा होती; परंतु आश्विन जखमी असल्यामुळे त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने एक आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे बीसीसीआयने अंकित बावणे याच्यावर भारत अ संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. आर. आश्विन याच्या जागेवर निवड समितीने शाहबाज नदीम याला भारतीय अ संघात स्थान दिले आहे, तर भारत अ संघात आधी निवड झालेला अक्षदीप नाथ हा भारत ब संघाकडून खेळणार आहे. विशेष म्हणजे अंकित बावणे याने या रणजी हंगामात महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषववले आहे.वेळापत्रक४ मार्च : भारत अ वि. भारत ब५ मार्च : भारत ब वि. कर्नाटक६ मार्च : भारत अ वि. कर्नाटक८ मार्च : फायनलविजय हजारे करंडकमध्ये उमटवला ठसादेवधर करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय अ संघाच्या कर्णधारपदी निवड झालेल्या महाराष्ट्राच्या अंकित बावणे याने नुकत्याच झालेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवताना ७ सामन्यात ६१.२0 च्या जबरदस्त धावसरासरीने ३0६ धावा फटकावल्या आहेत.त्यात अंकितने बिलासपूर येथे उत्तर प्रदेशविरुद्ध केलेल्या नाबाद ११७, त्रिपुरा संघाविरुद्ध निर्णायक लढतीत ५१ आणि मुंबईविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीतील नाबाद ३७ धावांच्या खेळीचा समावेश आहे.याच मालिकेदरम्यान कर्नाटकविरुद्धच्या लढतीदरम्यान अंकित बावणे याने त्याच्या वनडे कारकीर्दीतील २ हजार धावांचाही पल्ला गाठला होता.अंकितने ६१ वनडे लढतीत ५ शतक व ८ अर्धशतकांसह ४१.७२ च्या सरासरीने २00३ धावा केल्या आहेत. तसेच ७८ प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये १७ शतके व २८ अर्धशतकांसह त्याने ५२.१0 च्या भक्कम सरासरीसह ५ हजार ३६७ धावा ठोकल्या आहेत.