शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

क्षमता वाढली; औरंगाबादमधील अलगीकरण कक्ष आता कोविड उपचार केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 16:00 IST

पॉझिटिव्ह आलेल्या ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. अशा रुग्णांवर महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देअलगीकरणासाठी स्वतंत्र कक्ष. मागील काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने शहरातील जास्तीत जास्त नागरिकांच्या तपासणीवर भर दिला आहे. मागील चार महिन्यांत सोमवारी प्रथमच ५२६ संशयित रुग्णांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. तपासणी आकडा आणखी वाढविण्यात येणार असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही पुढील दिवसात वाढणार आहे. पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी मंगळवारी महापालिकेने अलगीकरण कक्षांचे रूपांतर कोविड उपचार केंद्रात करण्याचा निर्णय घेतला.

महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दुपारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत म्हाडाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर, टास्क फोर्सच्या प्रमुख अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांची उपस्थिती होती. पॉझिटिव्ह आलेल्या ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. अशा रुग्णांवर महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मागील काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे तातडीने नवीन १,३६२ बेडची व्यवस्था करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अलगीकरण कक्षांमध्ये संशयित रुग्ण ठेवण्यासाठी जागा वाढविण्याचा आणि नवीन काही केंद्र सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

युद्धपातळीवर  काम सुरू कराअलगीकरणासाठी कलाग्राम येथे संपूर्ण १५० खोल्या सुरू करणे, नवखंडा महाविद्यालय, देवळाई आणि नक्षत्रवाडी येथील म्हाडा स्कीमअंतर्गत बांधलेल्या रिकाम्या खोल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वसतिगृह, इतर महाविद्यालयात आणि त्यांचे वसतिगृह अलगीकरण केंद्र करण्यासाठी अधिग्रहित करण्यासाठी सूचना केल्या. 

नवीन उपचार केंद्रदेवगिरी मुलांच्या वसतिगृहात १७८ बेड, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलांचे वसतिगृह १०० बेड, साई  वसतिगृह १५० बेड, महाराष्ट्र उद्योजक महामंडळ ५२ बेड, हॉलिडे कॅम्प १२० बेड, जामा मशीद १५० बेड, गारखेडा क्रीडा संकुल ३०० बेड, शासकीय तंत्रनिकेतन १०० बेड, शासकीय अभियांत्रिकी मुलींचे वसतिगृह १०० बेड, सी ब्लॉक एमजीएम २०० बेड, तसेच महापालिकेचे सुरू असलेले किलेअर्क सीसीसी सेंटरमध्ये ३०० बेड, एमआयटी मुलांचे वसतिगृह २०० बेड, एमजीएम स्पोर्टस् कॉम्प्लेक्स ७० बेड, ईओसी पदमपुरा  ४५ बेड, सीसीसीमध्ये ३०० बेड, असे सर्व मिळून सुमारे १,३६२ लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार करणे शक्य झाले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद