शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चोरीला गेलेल्या बारा दुचाकींसह दोन तलवारी, बंदूक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:55 IST

जिंतूर : तालुक्यात दुचाकी चोरीचा तपास करीत असताना पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, या तिघांकडून बारा दुचाकी, दोन तलवारी, एक गन आणि ५ नंबर प्लेट जप्त केल्या आहेत.

ठळक मुद्दे आरोपी तीन दिवसांची पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : तालुक्यात दुचाकी चोरीचा तपास करीत असताना पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, या तिघांकडून बारा दुचाकी, दोन तलवारी, एक गन आणि ५ नंबर प्लेट जप्त केल्या आहेत. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, २५ जुलै रोजी न्यायालयाने तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.जिंतूर शहरातील देवेंद्र बनकुरे यांची दुचाकी काही दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. यापूर्वीही दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडल्या असल्याने जिंतूर येथे दुचाकी चोरीचा शोेध लावण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. चोरी प्रकरणाचा तपास करीत असताना २३ जुलै रोजी या पथकाने अनिकेत दिगंबर जगताप (२०, रा.पुंगळा) याला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली देत आणखी तीन दुचाकी पोलिसांकडे दिल्या. २४ जुलै रोजी या पथकाने अनिकेतचा साथीदार सय्यद वाजीद सय्यद गफूर ऊर्फ सलमान (२६, रा.टिपू सुलतान चौक, जिंतूर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करुन त्याच्याकडून ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या. दोन धारदार तलवारी, दोन जांबिया, एक एअर गन, ५ नंबर प्लेट असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याने पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेत २५ जुलै रोजी आदिनाथ रामदास बैकारे यास अटक केली. पोलिसांनी या तिन्ही आरोपींच्या ताब्यातून बारा दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, २६ जुलै रोजी त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.