शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कावळ्यांनी केले रक्तबंबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 00:39 IST

औरंगाबाद : प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या निष्काळजीणामुळे सांबरांची अवस्था मगरी आणि बगळ्यांपेक्षाही अतिशय वाईट झाली आहे.

औरंगाबाद : प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या निष्काळजीणामुळे सांबरांची अवस्था मगरी आणि बगळ्यांपेक्षाही अतिशय वाईट झाली आहे. कावळ्यांच्या सततच्या टोचण्यांमुळे येथील जवळपास सर्वच सांबर अक्षरश: रक्तबंबाळ झाली आहेत. गेल्या किती तरी महिन्यांपासून रोज शेकडो कावळे टोचण्या मारून सांबरांना जखमी करीत असताना प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी मात्र, त्याकडे पुरते दुर्लक्ष करीत आहेत. मनपाच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात बिबट्यांच्या तीन बछड्यांचा नुकताच मृत्यू झाला. प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी गरोदर रेणूची योग्य काळजी न घेतल्यामुळेच तिची मुदतपूर्व प्रसूती झाली. परिणामी अशक्त जन्मलेली तिन्ही पिल्ले जन्मानंतर ३६ तासांतच दगावली. सध्या वन विभाग आणि पशुसंवर्धन विभागाकडून त्याची चौकशी सुरू आहे. परंतु केवळ बिबट्यांनाच नव्हे तर इतर प्राण्यांनाही प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मगरी आणि बगळ्यांचे हौद रिकामे झाले आहेत. त्यात तळाला अगदीच थोडे पाणी असल्यामुळे या प्राण्यांची गैरसोय होत आहे. तर दुसरीकडे सांबरांची अवस्था त्याहीपेक्षा वाईट आहे. याठिकाणी खूप मोठ्या जागेत जवळपास पन्नासहून अधिक सांबरांना ठेवण्यात आलेले आहे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून यातील बहुसंख्य सांबर हे कावळ्यांच्या टोचण्यांमुळे जखमी झाले आहेत. शेकडो कावळे दिवसभर अंगावर बसून टोचण्या मारत असल्यामुळे अनेक सांबर रक्तबंबाळ झाले आहेत. परंतु एवढे सर्व होऊनही प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. कावळ्यांचा त्रास रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.