शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांनी टाळला अमावस्येचा मुहूर्त

By admin | Updated: January 28, 2017 00:48 IST

बीड : पहिल्याच दिवशी जिल्हाभरात एकही उमेदवारी अर्ज आला नाही.

बीड : मिनी मंत्रालयाचा रणसंग्राम शुक्रवारपासून सुरू झाला आहे. मात्र, अमावस्येच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असला तरी पहिल्याच दिवशी जिल्हाभरात एकही उमेदवारी अर्ज आला नाही. पुरोगामी म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनी अमावस्येचा मुहूर्त टाळणे पसंत केले.जिल्हा परिषदेच्या ६० गट व पंचायत समितीच्या १२२ गणांमध्ये निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मागील महिनाभरापासून विविध पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गावागावात बैठका, रॅली, कॉर्नर बैठकांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उमेदवारी मिळण्याआधीच संभाव्य उमेदवारांनी गट-गणातील वाड्या - वस्त्या - तांड्यावर संपर्क वाढवून प्रचाराचा धुराळा उडविला आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी अशी मुदत आहे. अवघ्या सहा दिवसांची मुदत असतानाही पहिल्याच दिवशी अमावस्या आल्याने नामनिर्देशन पत्र दाखल करणे उमेदवारांनी टाळले. तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी सकाळपासूनच यंत्रणा सज्ज होती. मात्र, सर्वच ११ तालुक्यांमध्ये एकही उमेदवारी अर्ज आला नाही. उमेदवार व त्यांचे समर्थक केवळ अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया, कागदपत्रांची माहिती जाणून घेत होते. अनेकजण कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहेत. तथापि, शनिवारपासून अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)