शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

‘कॅन्सर’- महिलांनी जागरूक होणे आवश्यक

By admin | Updated: October 13, 2016 01:06 IST

ऋचिका पालोदकर , औरंगाबाद ‘कॅन्सर’ हा शब्द ऐकताच प्रत्येकाला धडकी भरते. प्रत्यक्ष कॅन्सरग्रस्त असणाऱ्यांची तर गोष्टच वेगळी. रुग्णांसह संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडणारा हा आजार.

ऋचिका पालोदकर , औरंगाबाद‘कॅन्सर’ हा शब्द ऐकताच प्रत्येकाला धडकी भरते. प्रत्यक्ष कॅन्सरग्रस्त असणाऱ्यांची तर गोष्टच वेगळी. रुग्णांसह संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडणारा हा आजार. मात्र, आज उपलब्ध असणाऱ्या अनेक सुविधांच्या जोरावर या आजारातून पूर्णपणे बाहेर पडता येते हेही तेवढेच खरे आहे. आॅक्टोबर महिना हा ‘स्तन कॅन्सर जनजागृती महिना’ म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने या विषयातील जाणकार महिला तसेच डॉक्टरांशी चर्चा करून त्यांची जाणून घेतलेली ही मते. काही वर्षांपूर्वी भारतात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत कमी आढळून येत होते. गर्भाशयाचा किंवा ‘सर्व्हिक्स’च्या कर्करोगाचे प्रमाण भारतीय महिलांमध्ये अधिक दिसून यायचे. परंतु आता भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१२ च्या आकडेवारीनुसार १ लाख ४४ हजार ९३७ भारतीय महिलांना स्तनांचा कर्करोग झाला होता. त्यापैकी ७० हजार २१८ महिलांचा मृत्यू झाला. यावरून असे लक्षात येते की, कर्करोगाने ग्रस्त दर दोन स्त्रियांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.या आजाराचे प्रमाण पाहता महिलांमध्ये याविषयी जागरूकता येणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकर न झाल्यामुळे किंवा महिला त्यांच्या प्रकृतीबाबत जागरूक नसल्यामुळे मृत्यूदराचे प्रमाण जास्त दिसून येते. परंतु दर महिन्याला घरच्या घरी महिलांनी काही तपासण्या केल्यास रोगाचे निदान लवकर होऊन महिला या आजारातून पूर्णपणे बाहेर पडू शकतात.