शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

कॅम्पस क्लबतर्फे आज विद्यार्थ्यांसाठी फेस्टिव्ह आर्ट कॉम्पिटिशन

By admin | Updated: December 28, 2014 01:25 IST

औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबच्या वतीने उद्या रविवारी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फेस्टिव्ह आर्ट कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबच्या वतीने उद्या रविवारी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फेस्टिव्ह आर्ट कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सकाळी ९.३० वाजता लोकमत भवन, जालना रोड येथे आयोजित करण्यात आली असून, ती पाच गटांमध्ये घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटाला ठराविक विषय देण्यात आला आहे. यात नर्सरी ते सिनिअर के.जी.च्या विद्यार्थ्यांसाठी रंग भरा ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेची वेळ स. १० ते ११.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना कच्चे रेखाटन आयोजकांकडून पुरविण्यात येणार आहे. पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना ग्रीटिंग कार्ड या विषयाची स्पर्धा राहील. या स्पर्धेची वेळ १० ते ११.३० वाजेपर्यंत असेल. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना आवश्यक ए-३ साईज पेपर आयोजकांकडून पुरविला जाईल, बाकीचे आवश्यक सजावटीचे सामान स्पर्धकांनी सोबत आणावे. तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी स. १० ते ११.३० या वेळेत पॉट डेकोरेशन ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ११.३० ते १.०० या वेळेत पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून शुभेच्छापत्र बनविणे ही स्पर्धा घेतली जाईल. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रॉप पेपरपासून ख्रिसमस ट्री बनविणे ही स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेची वेळ ११.३० ते १.०० वाजेपर्यंत अशी आहे. या तिन्ही गटांतील स्पर्धकांनी आवश्यक ते सर्व सामान स्वत: आणावे.या स्पर्धेमधून प्रत्येक गटातून ३ पारितोषिके काढण्यात येतील. सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रही देण्यात येईल. सहभागी स्पर्धकांनी डेकोरेशनसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य सोबत आणावे. कॅ म्पस क्लबच्या सदस्यांसाठी या स्पर्धेत मोफत प्रवेश दिला जाईल. मात्र, त्यांच्यासोबत कॅम्पस क्लबचे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. तसेच कॅम्पस क्लबचे सदस्य नसणाऱ्या सदस्यांसाठी ५० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी ९०११४९८७७९ या नंबरवर संपर्क साधावा.