माहोरा : जाफराबाद उपविभाग अंतर्गत माहोरा व परिसरात १९ गावांमध्ये वीजचोरांविरूद्ध सहाय्यक अभियंता बारोटे यांनी गेल्या काही दिवसांपासून धडक कार्यवाही सुरू केली आहे.माहोरासह कोल्हापूर, चापनेर, जानेफळ, चिंचखेडा, आसई, वडाळा आदी गावांत वीज चोरांविरूद्ध अधिनियम १३५ अन्वयेप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे. वीजचोरांविरूद्ध लवकरच कठोर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. कारवाई टाळण्यासाठी अनधिकृत वीजजोडणी घेतलेल्या ग्रामस्थांनी अधिकृत वीज जोडणीसाठी अर्ज करावेत, रितसर कागदपत्रांची पूर्तता करावी, त्यांना लवकरात लवकर माहोरा शाखेकडून वीजपुरवठा देण्यात येईल, असे ते म्हणाले. अनधिकृत वीजजोडणी घेतलेल्या वीजचोरांविरुद्ध कारवाई करताना कोणतीही दया दाखविली जाणार नाही, असा इशारा दिला. अभियंता सचिन तालेवार, उप कार्यकारी अभियंता लोसलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता बारोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली असून, या मोहिमेमुळे माहोरासह परिसरातील वीजचोरांमध्ये मात्र, एक प्रकारची दहशत निर्माण झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)
माहोऱ्यात वीजचोरीविरुद्ध मोहीम
By admin | Updated: August 12, 2014 01:56 IST