शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी बोलावलेले कर्मचारी रात्री रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:10 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि.२४) मतदान होत आहे. यासाठी १८ मतदान केंद्रांवर कर्मचा-यांना प्रशिक्षण देऊन मतदान केंद्रांतील साहित्य घेऊन जाण्यासाठी सकाळी ८ वाजता बोलावण्यात आले. मात्र, नियोजनाअभावी मतदान केंद्राकडे शेवटचा कर्मचारी रात्री ८ वाजता विद्यापीठातून बाहेर पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि.२४) मतदान होत आहे. यासाठी १८ मतदान केंद्रांवर कर्मचा-यांना प्रशिक्षण देऊन मतदान केंद्रांतील साहित्य घेऊन जाण्यासाठी सकाळी ८ वाजता बोलावण्यात आले. मात्र, नियोजनाअभावी मतदान केंद्राकडे शेवटचा कर्मचारी रात्री ८ वाजता विद्यापीठातून बाहेर पडल्याचे सूत्रांनी सांगितले.विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीतील गोंधळाची परंपरा मतदानाच्या दिवसापर्यंत कायम राहिली. प्रत्येक ठिकाणी नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले. मतदानासाठी चार जिल्ह्यांत ठरविलेल्या १८ मतदान केंद्रांवर केंद्रप्रमुख, मतदान अधिकाºयांसह इतर कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात येणार होते. हे प्रशिक्षण सकाळच्या सत्रात दिल्यानंतर १२ वाजेच्या आत उस्मानाबाद जिल्ह्यातील मतदान केंद्रांकडे अधिकारी रवाना होण्याची नियोजन केले होते. मात्र, प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर कोण कोठे जाणार याचेच नियोजन केलेले नव्हते. जेव्हा कोणी कुठे जायचे, असा प्रश्न उपस्थित झाला तेथून पुढे नियोजनाची तयारी सुरू केली. याशिवाय कर्मचाºयांना मतदान केंद्रावर कर्मचाºयांनी काय घेऊन जायचे याच्याही सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या. यामुळे दुपारपर्यंत हाच गोंधळ राहिला. दुपारनंतर कर्मचाºयांना मतदानासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर सायंकाळच्या वेळी कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना होण्यास सुरुवात झाली. मतदान केंद्रांवर पाठविला जाणारा शेवटचा कर्मचारी रात्री ८ वाजता विद्यापीठातून बाहेर पडल्याचे समजते. शुक्रवारी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. यामुळे उमेदवारांच्या प्रतिनिधींचे अर्ज, ओळखपत्र केव्हा तयार करून देणार, सीसीटीव्ही यंत्रणा केव्हा बसवणार, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.मतपत्रिका कमी पडल्याविद्यापीठाने पुरेशा प्रमाणात मतपत्रिका छापल्याच नसल्याचे दुपारी समोर आले. यानंतर मतपत्रिका छापण्याच्या आॅर्डर देण्यात आल्या. या मतपत्रिका सायंकाळपर्यंत विद्यापीठ प्रशासनाला मिळाल्याचे समजते. यावरून मतदानाविषयीचा निष्काळजीपणा स्पष्ट होते.