शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या माफ झालेल्या परीक्षा शुल्काचा हिशोब जुळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:11 IST

राज्य शासनाने २०१५-१६ यावर्षी मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ४ कोटी ५४ लाख रुपयांची रक्कम शासनाने महाविद्यालयांकडे वर्ग केली आहे. मात्र ही रक्कम संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना परत केली नसल्याची तक्रार मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे कुलगुरू, उच्चशिक्षण सहसंचालक यांच्याकडे केली.

ठळक मुद्देविद्यापीठ : उच्चशिक्षण सहसंचालकांचे विद्यापीठ व महाविद्यालयाला पत्र

औरंगाबाद : राज्य शासनाने २०१५-१६ यावर्षी मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ४ कोटी ५४ लाख रुपयांची रक्कम शासनाने महाविद्यालयांकडे वर्ग केली आहे. मात्र ही रक्कम संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना परत केली नसल्याची तक्रार मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे कुलगुरू, उच्चशिक्षण सहसंचालक यांच्याकडे केली. याबाबतची माहिती विद्यापीठाकडे उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सविस्तर माहिती काढण्याचा मुद्दा बुधवारी चर्चेला घेण्यात आला.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक बुधवारी झाली. यात ऐनवेळी परीक्षा शुल्क माफीचा मुद्दा ज्येष्ठ सदस्य संजय निंबाळकर यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीचे पैसे महाविद्यालयांना पाठविले असतील तर त्यांनी ते विद्यार्थ्यांमध्ये वाटप केले का नाही? याची माहिती घेण्यात यावी, तसेच ही माहिती आगामी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सविस्तरपणे मांडावी, अशा सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या. याविषयी अधिक माहिती घेतली असता, विद्यापीठ प्रशासनाकडेही परीक्षा शुल्क माफीच्या संदर्भात ठोस आकडेवारी नसल्याचे स्पष्ट झाले. कोणत्या महाविद्यालयांना परीक्षा शुल्काचे किती पैसे पाठविले, याचीही माहिती उपलब्ध नाही. याविषयी मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे कुलगुरू, सहसंचालकांना निवेदन देण्यात आले आहे. यात ४ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी महाविद्यालयांना वितरित करण्यात आल्याचा दावाही केला आहे. मात्र, याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. यावर्षी दुष्काळामुळे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तरीही नुकत्याच झालेल्या परीक्षांमध्ये परीक्षा शुल्काची वसुली करण्यात आलेली आहे. या परीक्षा शुल्काचे पैसेही महाविद्यालयांना मिळणार आहेत. यामुळे यावर्षीही पुन्हा मागील पैशांप्रमाणेच घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.परीक्षा शुल्काचे पैसे महाविद्यालयांना पाठविण्यात आले असून, त्याचे वितरण करण्यात आले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यानंतर तात्काळ महाविद्यालय आणि विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवून याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ज्या महाविद्यालयांना परीक्षा शुल्काचे पैसे मिळाले आहेत, मात्र त्यांनी संबंधित लाभार्थ्यांना वाटप केले नसतील, तर उचित कार्यवाही करण्यात येईल.- डॉ. सतीश देशपांडे, सहसंचालक, उच्चशिक्षण विभाग

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र