शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

केबल वायरने कापला तरुणाचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:18 IST

दुचाकीवरून घरी निघालेल्या महाविद्यालयीन तरुणांसमोर अचानक केबल वायर आले. या केबलने तरुणाचा गळाच चिरल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ४.२० वाजता महावीर उड्डाणपुलावर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद: दुचाकीवरून घरी निघालेल्या महाविद्यालयीन तरुणांसमोर अचानक केबल वायर आले. या केबलने तरुणाचा गळाच चिरल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ४.२० वाजता महावीर उड्डाणपुलावर घडली. गंभीर जखमी तरुणाला त्वरित खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला.मोबाइल कंपन्यांसारखी स्पर्धा शहरातील केबल आॅपरेटर्समध्ये आहे. कंपनीविरुद्ध स्थानिक केबल आॅपरेटर असा खेळ मागील काही वर्षांपासून रंगला आहे. एका मोठ्या केबल कंपनीने बहुतांश भाग खेचून घेतला आहे. स्थानिक केबल आॅपरेटर ग्राहक वाचविण्यासाठी धडपडत आहेत. मागील काही वर्षांमध्ये केबल कंपन्यांनी महापालिकेची कोणतीच परवानगी न घेता हजारो किलोमीटर्सच्या वायरचे जाळे विणले. प्रत्येक पथदिव्यावरून ही केबल ओढली आहे. या केबलमुळे वाहनधारक, नागरिकांना त्रास होईल, याचा विचार करण्यात आलेला नाही. शहर विद्रुपीकरणात केबलचे जाळे दिवसेंदिवस भर घालत आहे. महापालिका मात्र मूग गिळून आहे. एका खाजगी कंपनीला ४ जी केबल टाकायची होती. या कंपनीने अधिकृतपणे मनपाकडे दोन कोटी रुपये भरून शहरात केबल टाकली. हाच नियम केबल कंपन्यांनाही लागू होतो. सर्व नियम धाब्यावर बसवून केबल कंपन्या काम करीत असल्याने आज औरंगाबादकर असुरक्षित झाले आहेत.