शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय राजस्वला समृद्ध परंपरेचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:59 IST

भारतीय राजस्वला (अर्थनीती) समृद्ध परंपरेचा इतिहास लाभलेला आहे. चाणक्य यांच्या माध्यमातून भारतानेच राजस्वची विचारधारा दिली, असे प्रतिपादन आयकर विभागाचे प्रधान आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भारतीय राजस्वला (अर्थनीती) समृद्ध परंपरेचा इतिहास लाभलेला आहे. चाणक्य यांच्या माध्यमातून भारतानेच राजस्वची विचारधारा दिली, असे प्रतिपादन आयकर विभागाचे प्रधान आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी केले.सीए उमेश शर्मा यांनी ‘लोकमत’मध्ये लिहिलेल्या ‘करनीती’ स्तंभातील २०० भागांचा समावेश असलेल्या ‘इन्कमटॅक्स आपल्यासाठी’ आणि ‘जीएसटी आपल्यासाठी’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन शिवदयाल श्रीवास्तव आणि स्टेट जीएसटीच्या सह आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते तापडिया नाट्यगृहात झाले. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा अध्यक्षस्थानी होते. आ. प्रशांत बंब, प्रकाशक बाबा भांड, सीए आर. बी. शर्मा, औरंगाबाद सीए शाखेचे अध्यक्ष अल्केश रावका, लेखक उमेश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी श्रीवास्तव म्हणाले, पुढील पिढ्यांनी आपली ओळख काढायची असेल, तर पुस्तके लिहिली पाहिजेत; मात्र त्या पुस्तकात मांडलेल्या मतांची दैनंदिन जीवनात अंमलबजावणी झाली पाहिजे. उमेश शर्मा यांनी पुस्तकात लिहिलेले आम्ही, ते जेव्हा करदात्यांना आमच्याकडे घेऊन येतील, तेव्हा पडताळून पाहूत, तेव्हा त्यांनी लिहिलेले आणि प्रत्यक्षात त्यांचे वागणे यातून सर्व काही बाहेर येईल, असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. दोनपैकी इन्कमटॅक्स पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा कलर निळा, तर जीएसटीचा लाल ठेवला. यावरूनही त्यांनी चिमटे काढले. त्याला सर्व रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अध्यक्षीय समारोपात राजेंद्र दर्डा म्हणाले, उमेश शर्मा यांनी अगदी सोप्या भाषेत किचकट अर्थनीती उलगडली आहे. ‘लोकमत’ व ‘लोकमत टाइम्स’मध्ये तब्बल चार वर्षांपासून सुरू असलेल्या ‘करनीती’ या स्तंभात २०० लेख प्रकाशित झाले. यातून आर्थिक साक्षरता मोठ्या प्रमाणात झाली. अनेक वेळा लेख वाचताना कृष्ण, अर्जुनाचे संदर्भ होते. यातून समजले की, करदाता हा अर्जुनाच्या भूमिकेत असतो. सर्वसामान्य करदात्याला अनेक प्रश्न पडतात. त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मार्गदर्शन करणारा श्रीकृष्णही हवा असतो. अशा ऐतिहासिक संदर्भांचा हवाला देऊन सहज, सोप्या शब्दांत उमेश शर्मा यांनी ‘करनीती’ लिहिली असल्याचा गौरवही त्यांनी केला. या वर्षात सरकारने अर्थविषयक तीन मोठे निर्णय घेतले आहेत. त्यात नोटाबंदी, रेरा कायदा आणि जीएसटीचा समावेश आहे. यामुळे अनेकांची अडचण झाली असेल; परंतु यातील जीएसटी हा दीर्घकाळासाठी महत्त्वाचा आहे. यामुळे शर्मा यांचे दुसरे पुस्तक ‘जीएसटी आपल्यासाठी’ हे तितकेच महत्त्वाचे असल्याचेही दर्डा यांनी स्पष्ट केले. सीए अल्केश रावका यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात प्रकाशक बाबा भांड यांनी ज्ञानाला वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य लेखक आणि प्रकाशक करीत असल्याचे सांगितले. पाहुण्यांचा परिचय प्रतिभा भांड यांनी करून दिला. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार सीए आर. बी. शर्मा यांनी मानले. खचाखच भरलेल्या नाट्यगृहात साहित्य, संस्कृती, राजकीय, सीए, व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यवसायासह अनेक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.साक्षरता वाढविण्याची गरजदेशात साक्षरतेचे प्रमाण ७५ टक्के, तर राज्यात ८३ टक्के आहे; मात्र आर्थिक साक्षरतेचे प्रमाण केवळ २३ टक्केच आहे. देशाच्या विकासासाठी आर्थिक साक्षरतेचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केली.करदात्यांचा पैसा जबाबदारीने वापरावाआ. बंब यांनी करदात्यांच्या पैशाविषयी भाष्य केले. याचा संदर्भ घेत कररूपाने जमा होणारा पैसा राजकारण्यांनी जबाबदारीने वापराला पाहिजे. तो वापरतात का? हा संशोधनाचा विषय असल्याचे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.