शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

सीएने सीएबीएफमध्ये अधिक योगदान द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:03 IST

औरंगाबाद : सीए संघटनेला अधिक मजबूत करून भविष्यात आणखी उपक्रम राबविण्यासाठी सर्व चार्टर्ड अकाउंटंटस्‌नी बेनिव्हल फंड (सीएबीएफ)मध्ये अधिक ...

औरंगाबाद : सीए संघटनेला अधिक मजबूत करून भविष्यात आणखी उपक्रम राबविण्यासाठी सर्व चार्टर्ड अकाउंटंटस्‌नी बेनिव्हल फंड (सीएबीएफ)मध्ये अधिक योगदान द्यावे, असे आवाहन सीए संघटनेच्या पश्चिम भारत विभागीय परिषदचे (डब्ल्यूआरआरसी) अध्यक्ष मनीष गादिया यांनी येथे केले.

सातारा परिसरातील आयसीएआय भवनला गुरुवारी पश्चिम विभागीय परिषद पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी अध्यक्ष मनीष गादिया यांनी संघटना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यावर भर दिला. प्रारंभी, स्थानिक सीए संघटनेचे अध्यक्ष पंकज सोनी व विकासा अध्यक्ष रूपाली बोथरा यांनी पश्चिम विभागीय परिषदेचे अध्यक्ष गादिया, उपाध्यक्ष द्रष्टी देसाई, सचिव अर्पिता काबरा, कोषाध्यक्ष जयेश काला, पश्चिम विभागीय परिषदेचे विकासाचे अध्यक्ष यशवंत कासार आणि आयसीएआयचे थेट कर समितीचे अध्यक्ष सी.व्ही. चितळे यांचा सत्कार केला.

ऑनलाइन मोडद्वारे पॉडकास्ट भागांचा पहिला पुढाकार घेण्यात आल्याबद्दल गादिया यांनी औरंगाबाद शाखेचे व विकासा समितीचे अभिनंदन केले. यावेळी देसाई यांनी संघटनेच्या कार्याची माहिती करून दिली, तसेच ‘महिला सशक्तीकरण व रोजगाराच्या संधी’ याविषयी संबोधित केले. यावेळी २०२१ मध्ये झालेल्या नवीन चार्टर्ड अकाउंटंटस्‌चा सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यास सीए उमेश शर्मा, तसेच संघटनेचे सचिव प्रवीण बांगड, कोषाध्यक्ष गणेश भालेराव, माजी अध्यक्ष रोहन आचलिया, गणेश शीलवंत यांची उपस्थिती होती.