शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नाफेड, राज्य शासनाकडून तीन लाख क्विंटल तूर खरेदी

By admin | Updated: May 29, 2017 00:25 IST

लातूर : शहरासह जिल्ह्यात औसा, रेणापूर, चाकूर, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर आदी ठिकाणी आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : शहरासह जिल्ह्यात औसा, रेणापूर, चाकूर, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर आदी ठिकाणी आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून या केंद्रावरुन गेल्या आठ दिवसात ३४ हजार ८१० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. नाफेड आणि राज्य सरकारकडून आतापर्यंत एकूण २ लाख ९८ हजार ८७५ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात नव्या तीन खरेदी केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील एकूण नऊ केंद्रावर तुरीची खरेदी सुरु आहे.लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरु करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शिल्लक तुरीची आवक होत आहे. विशेष म्हणजे तूर खरेदीदरम्यान झालेल्या गोंधळामुळे आता प्रशासनाने तूर खरेदी करण्यासाठी विविध अटी घातल्या आहेत. तूर खरेदी करण्यासाठी सातबारा, पीकपेरा, आधार आणि बँक खात्याची झेरॉक्सची प्रत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे सादर करावी लागणार आहे़ या कागदपत्रांची तहसीलदारांकडून पडताळणी केल्यानंतर शेतकऱ्यांना टोकण दिले जाणार आहे. या टोकणच्या आधारे शेतकऱ्यांची तूर केंद्रावर खरेदी सध्याला सुरू आहे़ प्रशासनाने लादलेल्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांची कोंडी होत आहे़ उदगीर येथील तूर खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची तूर खरेदी झाल्याच्या संशयावरुन येथील केंद्र बंद करण्यात आले होते. दरम्यान, उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांची तूर जळकोटच्या केंद्रावर खरेदी करण्यात आली़ मुदत संपल्यानंतर सर्वच केंद्र बंद करण्यात आली़परिणामी, शेतकऱ्यांच्या शिल्लक तुरीचा प्रश्न गंभीर बनला. यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी आंदोलन केले होते. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिली. यानंतर लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती, रेणापूर, औसा, अहमदपूर, चाकूर आणि शिरुर अनंतपाळ येथे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले़ लातूरच्या केंद्रावर निलंगा, देवणी आणि उदगीर तालुक्यातील तुरीची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने येथील यंत्रणा कोलमडली. तूर घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उदगीर, निलंगा, देवणी येथे तीन केंद्र सुरु केले आहे.