शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

आरक्षित प्लॉट खरेदी करायचायं? माहुरात या!

By admin | Updated: February 24, 2016 23:53 IST

इलियास बावाणी, माहूर शहरातील अनेक महत्त्वाच्या जागांवर धनदांडग्यांनी अतिक्रमण केले असून उलटसुलट कागदपत्रे तयार करून वेळप्रसंगी न्यायालयात याच कागदपत्रांअधारे खटले लढवून घट्ट बस्तान बसविले़

इलियास बावाणी, माहूरशहरातील अनेक महत्त्वाच्या जागांवर धनदांडग्यांनी अतिक्रमण केले असून उलटसुलट कागदपत्रे तयार करून वेळप्रसंगी न्यायालयात याच कागदपत्रांअधारे खटले लढवून घट्ट बस्तान बसविले़ नगरपंचायतला लागून असलेल्या मुख्य रस्त्यावरील जागा डीपी प्लॅनमध्ये आरक्षित असताना याचे पीआर कार्ड बनले कसे? असा सवाल माहूरकरांचा आहे.माहूर शहर हे पौराणिक, ऐतिहासिक पर्यटनस्थळ असल्याने शासन देवस्थानासह भाविक पर्यटकांच्या सोयीसुविधांसाठी शहरावर कोट्यवधी खर्च करीत असताना दुसरीकडे शहरातील मूलभूत प्रश्नांकडे संबंधित विभागांनी गेल्या ४५ वर्षांत कधीही लक्ष न दिल्याने शहराची बकालावस्था झाली़ नगर- पंचायतनेही गेल्या चार वर्षांत या प्रश्नांकडे गांभीर्याने बघितले नसल्याने शहर झोपडपट्टीसारखे दिसत आहे़ पौराणिक पुराव्यानुसार श्रीक्षेत्र माहूर शहर अतिप्राचीन असून येथे देवदेवतांचा वास आहे़ तर ऐतिहासिक काळातील भक्कम पुरावे रामगड किल्ल्याच्या रुपात आजही भक्कमपणे उभे असल्याने पर्यटकही मोठ्या प्रमाणात येथे येतात़ अधिकाऱ्यांनी किल्ल्यासह जंगलाचे संरक्षण व्यवस्थित न केल्याने येथील निसर्गचक्रावर मोठा परिणाम झाला.नगरपंचायतच्या मालकीची जागा : शहराच्या मुख्य चौकात नगरपंचायतच्या मालकीची मोठी जागा असून येथे किरकोळ व्यापाऱ्यांनी भाडेतत्वावर टीनशेडची दुकाने थाटून गेल्या ४० वर्षांपासून व्यापार सुरू केला आहे़ यासह ऩप़ने बनविलेले नऊ गाळे मोडकळीस आले. याला लागून तसेच मागे भरपूर जागेवर झोपडपट्टीसारखी दुकाने आहेत़ अनेकवेळा मान्यवरांनी या पूर्ण जागेवर अद्ययावत शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवावे यासाठी पाठपुरावा केला होता़ परंतु सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.शहरासह तालुक्याला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत़ भूमी अभिलेख कार्यालयाकडून सन १९७२ मध्ये शहराची मोजणी करण्यात आली़़ याचवर्षी डी़पी़ प्लॅनही तयार करण्यात आला़ भूमी अभिलेख कार्यालयात त्यावेळी गावात ६८४ मालमत्तांची नोंद घेण्यात आली़ नगरपंचायतच्या जागांची नोंद असून मंदिर, मशीद, दर्गाह, बौद्ध विहारासह डीपी प्लॅनमध्ये ४० पेक्षा जास्त ठिकाणी अनेक प्रकारचे आरक्षण टाकण्यात आले होते़ गेल्या चार वर्षांपर्यंत ग्रामपंचायत अस्तित्वात असल्याने या काळात डीपी प्लॅनसह भूमी अभिलेख कार्यालयातील नोंदी अद्ययावत करण्यासाठी कुठलीच अंमलबजावणी करण्यात न आल्याने ६८४ घरांचंी आज ऩप़ रेकॉर्डमध्ये १०० टक्के अदलाबदल झाली, परंतु या रेकॉर्डची मूळ पी़ आऱ कार्डमध्ये नोंद घेण्यात आली नाही़ मूळमालक हयात नाहीत याचीही नोंद घेण्यात आली नाही.