शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बिनधास्त जाळला जातोय कचरा!

By admin | Updated: February 3, 2017 00:41 IST

लातूर : वाढत्या प्रदुषणामुळे जीवाची घालमेल होत असतानाच शहरातील काही भागात बिनधास्तपणे कचरा जाळण्यात येत आहे़

लातूर : वाढत्या प्रदुषणामुळे जीवाची घालमेल होत असतानाच शहरातील काही भागात बिनधास्तपणे कचरा जाळण्यात येत आहे़ विशेष म्हणजे, कचरा जाळणाऱ्यांना कायद्याच्या उल्लंघनाची माहिती नाही की? जाणीवपूर्वक कचरा जाळत आहेत, हे अनुत्तरीय आहे़ त्यातच महापालिकेचेही दुर्लक्ष होत असल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचा धूर निघत असल्याचे दिसून येत आहे़ परिणामी, प्रदुषणात भर पडत आहे़ शहरातील प्रकाश नगर, खाडगाव रोड, आदर्श कॉलनी, खोरी गल्ली, शामनगर परिसरात बिनधास्तपणे कचरा जाळल्याचे दृश्य ‘लोकमत’च्या कॅमेऱ्याने टिपले आहे़ एकीकडे महापालिकेच्या वतीने स्वच्छ शहर, सुंदर शहर निर्माण करण्यावर भर देत असली तरी दुसरीकडे याच महापालिकेचे कचरा उचलण्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे़ स्वच्छतेसाठी महापालिकेच्या वतीने चार झोन तयार करण्यात आले असून त्यातील अ, ब, क या झोनमध्ये प्रत्येकी ९ तर ड मध्ये ८ झोन आहेत़ तसेच प्रत्येक गल्लीबोळातील कचरा उचलण्यासाठी ९३ अ‍ॅपे, ३८ टॅक्टर आणि १२ टिप्पर आहेत़ घंटागाडीद्वारे एकत्रित करण्यात येणारा कचरा प्रत्येक झोनमधील रॅम्पवरुन वरवंटी कचराडेपो येथे टाकण्यात येतो़ गेल्या काही दिवसांपासून काही प्रभागातील गल्लीबोळातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्याच फिरत नसल्याचे दिसून येत आहे़ परिणामी, काही नागरिक विरळ वस्ती असलेल्या रस्त्याच्या बाजूस हा कचरा टाकत आहेत़ तिथे ढीग साचलेले पाहून परिसरातील नागरिक हा कचरा पेटवून देत आहेत़ एवढेच नव्हे तर शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच अन्य गल्लीबोळातील रस्त्यांच्या बाजूस कचऱ्याचे ढिगारे पडलेले दिसून येत आहेत़ कचऱ्याचे हे ढिगारे वाढत असल्याचे पाहून नजीकचे काही नागरिक ते ढिगारे पेटवून देत आहेत़ विशेष म्हणजे, पहाटेच्या वेळी हा कचरा पेटवून दिला जात आहे़ त्याचा धूर दिवसभर परिसरात निघत असतो़ त्यामुळे शहरातील प्रदुषणात वाढ होत आहे़वास्तविक पाहता, कचरा जाळणे हे कायद्याचे उल्लंघन असून तो गुन्हाही ठरतो़ परंतु, कचरा जाळणारे हे नागरिक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात की, त्यांना त्याची माहिती नाही, हे अनुत्तरीय आहे़ विशेष म्हणजे, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे़ त्यामुळे कचरा जाळण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पहावयास मिळत आहे़