शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुरात प्रशासन ढेपाळले

By admin | Updated: June 19, 2014 00:52 IST

विजय गायकवाड , वैजापूर वैजापूर शहरातील एकूण २८ विविध शासकीय कार्यालयांपैकी २२ शासकीय कार्यालयांचे प्रमुख मुख्यालयी राहत नसल्याची बाब समोर आली आहे.

विजय गायकवाड , वैजापूरवैजापूर शहरातील एकूण २८ विविध शासकीय कार्यालयांपैकी २२ शासकीय कार्यालयांचे प्रमुख मुख्यालयी राहत नसल्याची बाब समोर आली आहे. २८ पैकी फक्त सहाच कार्यालय प्रमुख मुख्यालयी राहतात. अन्य शासकीय कार्यालय प्रमुख दांड्या मारताना दिसून येतात. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील शासकीय कार्यालयांचा कारभार असाच रामभरोसे सुरू आहे. वैजापूर शहरात एकूण २८ विविध शासकीय कार्यालये आहेत. यामध्ये उपविभागीय अधिकारी, तहसील, पोलीस ठाणे, पंचायत समिती, नगर परिषद, लागवड अधिकारी, उपविभागीय कृ षी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सहायक आयुक्त पशुसंवर्धन चिकित्सालय, उपजिल्हा रुग्णालय, बांधकाम उपविभाग, नांदूर-मधमेश्वर कालवा विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी, जिल्हा परिषद सिंचन, जिल्हा परिषद बांधकाम, तालुका वजन-मापे निरीक्षक, उपअधीक्षक भूमी अभिलेख, दुकाने व संस्था निरीक्षक , दुय्यम निबंधक, लघु पाटबंधारे स्थानिक स्तर, महावितरण कंपनी क्र. १ व २, दूरसंचार विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, तालुका आरोग्य अधिकारी व पंचायत समिती शिक्षण विभाग या कार्यालयांचा समावेश आहे. या २८ पैकी उपविभागीय अधिकारी, तहसील, पोलीस ठाणे, पंचायत समिती, उपजिल्हा रुग्णालय, एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी असे एकूण सहाच कार्यालय प्रमुख मुख्यालयी राहतात. उर्वरित २२ कार्यालयांचे प्रमुख अमावास्या- पौर्णिमेला येऊन शहरातील कार्यालयात हजेरी लावतात. वास्तविक पाहता सर्वच कार्यालय प्रमुखांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. तसे शासन परिपत्रकच निर्गमित करण्यात आले आहे. या सर्व अधिकाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळतो; परंतु अधिकारी शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून चुना लावीत आहेत. शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांचे प्रमुख आठवडी बाजाराच्या दिवशी म्हणजेच सोमवारी हजेरी लावताना दिसून येतात. आठवड्यातील उर्वरित दिवसांत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मर्जीनुसार कामकाज चालते. त्यामुळे अन्य दिवशी बहुतांश वेळा अधिकाऱ्यांच्या कार्यालयास दांड्याच असतात. अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी हे सर्वच अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वैजापूर येथील शासकीय कार्यालयांचा कारभार ‘आओ जाओ घर तुम्हारा’ यानुसार सुरू आहे. त्यांच्यावर ना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक आहे ना स्थानिक लोकप्रतिनिधींचा. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे तालुक्यातील नागरिक नाहकपणे वेठीस धरले जात आहेत.आठवडी बाजाराच्या दिवशीच हजेरीवैजापूर शहरात बहुतांश कार्यालय प्रमुखांना आठवडी बाजाराच्या दिवशी हजर राहून काम करण्याची सवय झाली आहे. आठवडी बाजाराच्या निमित्ताने नागरिक शासकीय कामांसाठी येत असले तरी या दिवशी नागरिकांचा लोंढा जास्त प्रमाणात येत असल्याने कामांचा निपटारा न होता जास्तीत जास्त कामे प्रलंबित राहतात. कामाचा निपटारा करण्यासाठी कार्यालय प्रमुखांनी आठवडाभर सातत्याने कार्यालयात हजर राहणे गरजेचे आहे; परंतु या ‘आठवडी’ अधिकाऱ्यांच्या मनमानी व गलथान कारभारामुळे मोठ्या प्रमाणावर कामे प्रलंबित राहतात. त्यांच्या या कारभारावर लगाम घालणे गरजेचे आहे.