शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सावकारी पाशामुळे व्यावसायिकाची आत्महत्या

By admin | Updated: December 11, 2014 00:46 IST

औरंगाबाद : सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाने आपल्या सिडको एन-१ भागातील दुकानातच फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला.

औरंगाबाद : सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाने आपल्या सिडको एन-१ भागातील दुकानातच फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. राजेश अंगद पाटील (४०, रा. पुंडलिकनगर) असे त्या व्यावसायिकाचे नाव आहे. पाटील हे मूळचे लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील रहिवासी होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी एन-१ भागात भारत बाजारमध्ये मातोश्री व्हील केअर नावाचे टायर विक्री व दुरुस्तीचे दुकान टाकले होते. दुकानासाठी त्यांनी एका खाजगी सावकाराकडून कर्ज घेतलेले होते. कर्जापूर्वीच सावकाराने त्यांच्याकडून काही कोऱ्या धनादेशांवर स्वाक्षऱ्या घेतलेल्या होत्या. पाटील यांनी कर्जाची रक्कमही फेडली होती; मात्र सावकाराने आणखी बाकी असल्याचे म्हणत पैशांची मागणी सुरू केलेली होती. पैसे दिले नाही तर केस करील, अशी सावकार धमकी देत होता. त्यातूनच ते वैतागून गेले होते. दरम्यान, मंगळवारी रात्री पाटील दुकानात गेले. आतमध्ये पत्र्याच्या अँगलला दोरी अडकवीत त्यांनी फाशी घेत आत्महत्या केली. सकाळी दुकानात काम करणारे माणिक शहा हे दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच सिडको एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना तेथे एक चिठ्ठी सापडली असून ती पाटील यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली आहे. या चिठ्ठीत त्यांनी सावकाराचा उल्लेख केलेला असल्याचे सूत्रांनी सांगितले.