शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बसने तरुणाला चिरडले

By admin | Updated: August 9, 2014 00:40 IST

नांदेड : शहरातील देगलूर नाका परिसरातील मुख्य रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे़ त्यामुळे महामंडळाच्या बसेस व इतर जड वाहने शहरातून धावत असून

नांदेड : शहरातील देगलूर नाका परिसरातील मुख्य रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे़ त्यामुळे महामंडळाच्या बसेस व इतर जड वाहने शहरातून धावत असून अपघातात अनेकांना जीवही गमवावा लागला आहे़ त्यात गुरुवारी रात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने एका दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली़देगलूर नाका ते हिंगोली गेट ओव्हरब्रीज दरम्यान रस्त्याचे काम हाती घेण्यात आले़ या ठिकाणी ड्रेनेज आणि जलवाहिनीसाठी चांगला रस्ताही खोदण्यात आला़ परंतु या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे़ त्यामुळे बसेस व इतर जड वाहनांना शहरातून जावे लागत आहे़ त्याचा परिणाम म्हणून शहरात दररोज वाहतुकीचा खोळंबा होत असून अपघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे़ गुरुवारी रात्री लोहा तालुक्यातील खानापूरकर येथील राजू उत्तमराव खानापूरकर हा इतर मित्रांसह दुचाकीवरुन देगलूर नाका परिसरातून रात्री नऊ वाजेच्या सुमारास जात होता़ यावेळी बिलोली-अकोला जाणाऱ्या बस क्रमांक एम़एच़२० बीएल-२०५६ ने राजू खानापूरकर याला चिरडले़ यावेळी राजूचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे़ त्यानंतर घटनास्थळी इतवारा पोलिसांनी धाव घेवून जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले़ भाग्यनगर, तरोडा नाका, व्हीआयपी रस्ता आदी मुख्य रस्त्यावर भरदिवसा जड वाहने सुसाट धावत आहेत़ याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे़ (प्रतिनिधी)