बीड : येथील चऱ्हाटा फाट्यावर अज्ञात तरुणांनी मंगळवारी रात्री एका बसवर दगडफेक केली. यात बसचे १५ हजारांचे नुकसान झाले.पुणे येथील चिंचवड आगाराची बस (एमएच ४० एन- ९२७२) बीडकडे येत होती. चऱ्हाटा फाट्याजवळ रात्री साडेआठ वाजता दुचाकीवरुन आलेल्या सात जणांनी बस अडवली. त्यानंतर दगडफेक करुन समोरील काचा फोडल्या. चालक विलास पंढरीनाथ चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. आरोपी फरार असून बुधवारी रात्रीपर्यंत त्यांना पकडण्यात यश आले नाही. (प्रतिनिधी)
चऱ्हाटा फाट्यावर फोडली बस
By admin | Updated: October 12, 2016 23:09 IST