शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जाळून पत्नीचा खून करणा-यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:40 IST

किरकोळ कारणावरून पत्नी मनीषा (२६) चा जाळून खून केल्याच्या आरोपाखाली तिचा पती राधेश्याम सुधाकर गजभार (३६) राहणार विष्णूनगर, औरंगाबाद याला सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : किरकोळ कारणावरून पत्नी मनीषा (२६) चा जाळून खून केल्याच्या आरोपाखाली तिचा पती राधेश्याम सुधाकर गजभार (३६) राहणार विष्णूनगर, औरंगाबाद याला सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.आरोपीचे मनीषासोबत २००३ ला लग्न झाले होते. मनीषा मोलमजुरी करीत होती. राधेश्यामला दारूचे व्यसन होते. प्लॉट खरेदी करण्यासाठी मनीषाने तिच्या माहेराहून एक लाख रुपये आणावेत या मागणीसाठी राधेश्याम मनीषाचा वारंवार शारीरिक, मानसिक छळ करीत असे, २२ फेब्रुवारी २०१३ रोजी ‘आत्या येणार आहे. चांगला स्वयंपाक तयार कर’ असे राधेश्याम घरातून बाहेर जात असताना पत्नीला म्हणाला. घरात रॉकेल नाही, असे पत्नीने उत्तर दिल्यावरून दोघांमध्ये वाद झाला. संध्याकाळी राधेश्याम रॉकेल घेऊन आला. त्यानंतर त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला असता राधेश्यामने तिला मारहाण केली आणि आणलेले रॉकेल पत्नी मनीषाच्या अंगावर ओतले व तिला पेटवून दिले. यात मनीषा ५७ टक्के भाजली होती. सासूने तिला दवाखान्यात दाखल केले. त्यावेळी स्टोव्हच्या भडक्याने भाजल्याचा जबाब मनीषाने पोलिसांना दिला होता. तो जबाब सासू आणि दिराच्या दबावाखाली दिला असल्याचे तिने पोलिसांना नंतर सांगितले होते. तिने कार्यकारी दंडाधिकाºयांसमोर दिलेल्या मृत्युपूर्व जबाबात मात्र, पतीने वरीलप्रमाणे रॉकेल टाकून जाळल्याचा जबाब दिला होता.राधेश्यामविरुद्ध सुरुवातीस भा.दं.वि. कलम ३०७ आणि ३२३ नुसार जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपचारादरम्यान १७ मार्च २०१३ रोजी मनीषाचे निधन झाले. त्यानंतर राधेश्यामविरुद्ध कलम ३०२ वाढविण्यात आले. तपासाअंती पोलीस अधिकारी शेख माजीद यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी अभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी ८ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यांच्यापैकी डॉक्टर, कार्यकारी दंडाधिकारी आणि मयताचे वडील रामभाऊ शिंदे यांचे जबाब महत्त्वाचे ठरले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी राधेश्यामला पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली भा.दं.वि. कलम ३०२ नुसार जन्मठेपेची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीला सहा महिने जादा सश्रम कारावास भोगावा लागे, असे आदेशात म्हटले आहे.