शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जळकोटकर पाण्यासाठी रानोमाळ !

By admin | Updated: February 20, 2015 00:08 IST

एम़जी़मोमीन ,जळकोट तालुक्यात यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने फेब्रुवारीतच पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत़

एम़जी़मोमीन ,जळकोटतालुक्यात यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने फेब्रुवारीतच पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत़ तालुक्यातील १२ साठवण व १०० इतर तलाव कोरडे पडले असून टंचाईवर मात करण्यासाठी दोन गावांत ५ टँकर सुरु करण्यात आले आहेत़ सात गावांत बोअर, विहिर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान १२०० मि़मी़असून यावर्षी केवळ ३०० ते ३५० मि़मी़ पाऊस झाला़ परिणामी, पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे़ जलस्त्रोत कोरडे पडत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी तासन्तास पाणवठ्यावर उन्हात थांबावे लागत आहे़ तालुक्यातील करजी, सोनवळा, मेवापूर, जळकोट या गावांना बोअर, विहिर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ तर जळकोट शहराला ४ टँकरने आणि उमरदरास १ ट्रॅक्टरने पाणीपुरवठा चालू आहे़ एकुर्गा, बोरगाव, शिवाजी नगर आदी गावांनी टँकरची मागणी केली आहे़ तालुक्यातील १२ साठवण तलावांनी तळ गाठला आहे़ यातील बहुतांशी तलावावर पाणीपुरवठा योजना आहेत़ परंतु, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल? त्यामुळे माळहिप्परगा तलाव वगळता उर्वरित तलाव कोरडेठाक पडल्याचे लघु पाटबंधारे विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून येत आहे़जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथील तलाव वगळता ढोरसांगवी, धोंडवाडी साठवण तलाव कोरडे पडले आहेत़ हळदवाढवणा, जंगमवाडी, सोनवळा, डोंगरगाव व गुत्ती १ या साठवण तलावांची पाणी पातळी जोत्याखाली आहे़ माळहिप्परगा तलावाचे काम दोन वर्षांपूर्वी झाल्यामुळे व इतर तलावांच्या तुलनेत माळहिप्परगा तलावातील पाणी उपसा कमी असल्यामुळे सध्या ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ रावणकोळा साठवण तलावात २६ टक्के, केकतसिंदगी तलावात १२ टक्के, गुत्ती तलावात ०़७० टक्के, चेरा तलावात ०़३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़