इरफान खान यांचे आझाद चौक ते टी.व्ही. सेंटर रस्त्यावर लक्की डोअर या नावाचे दुकान आहे. या दुकानात ते सागवान दरवाजे आणि खिडक्यांसह अन्य फर्निचर तयार करून विक्री करतात. शुक्रवारी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले. यानंतर मध्यरात्रीनंतर पावणेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानाला आग लागल्याचे गस्तीवरील पोलिसांना दिसले. या घटनेची माहिती सिडको फायर ब्रिगेडला कळविण्यात आली. अग्निशामक अधिकारी वैभव बाकडे, सोमीनाथ भोसले, अशोक वेलदोडे, बबन मावले आणि रवी दगडे यांनी तेथे धाव घेऊन अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले. यामुळे शेजारील दुकानांना आगीची झळ बसली नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी जिंसी ठाण्याचे निरीक्षक मयेकर, फौजदार पाटील आणि कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेत सुमारे दीड लाखाचे नुकसान झाल्याची फायर ब्रिगेड अधिकाऱ्यांनी सांगितले.
आझाद चौकात सागवान दरवाजाचे दुकान जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:02 IST