शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला जाळले; पतीला सात वर्ष सक्तमजुरी

By admin | Updated: August 9, 2014 00:39 IST

बिलोली: लग्नाच्या वर्षभरानंतरच दुचाकीची मागणी करून पूर्ण झाली नसल्याने पत्नीला जिवंत जाळणाऱ्या सुजलेगाव येथील तरुणाला बिलोलीच्या

बिलोली: लग्नाच्या वर्षभरानंतरच दुचाकीची मागणी करून पूर्ण झाली नसल्याने पत्नीला जिवंत जाळणाऱ्या सुजलेगाव येथील तरुणाला बिलोलीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सात वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे़नायगाव तालुक्यातील सुजलेगाव स्थित संदीप तुमवाड (वय २५) याचा २००९ मध्ये मोघाळीस्थित संगीता हिज सोबत विवाह झाला़ सासरच्या मंडळीकडून या ना त्या कारणाचा तगादा सुरू झाला़ पती संदीप याने दुचाकीची मागणी केली़ माहेरकडून पूर्तता झाली नसल्याने ३ मार्च २०१० रोजी संगीता उर्फ कृष्णाबाई (वय २२) हिस जाळण्यात आले़ ज्यात ती मरण पावली़ घटनेनंतर कुंटूर पोलिसा तिघांविरूद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला़पती, सासू, सासरे यांना अटक झाली़ प्रकरण बिलोलीच्या सत्र न्यायालयात दाखल झाले़ न्या़एक़े़ पाटील यांच्यासमोर चाललेल्या सुनावणीत पती संदीप हा दोषी आढळला़ पण सबळ पुरावा सासू सासऱ्याविरूद्ध सिद्ध होवू शकला नाही़वर्षभरातच पत्नीचा छळ करून पत्नीला जीवंत जाळल्या प्रकरणी आरोपी संदीप तुमवाड यास सात वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला़ सरकार पक्षाची बाजू अ‍ॅड़नीळकंठ कदम यांनी मांडली़ सासू-सासऱ्यांना निर्दोष सोडण्यात आले़ (वार्ताहर)