शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज महानगरात चोऱ्यांचे सत्र सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:07 IST

बजाजनगरातील महारुद्र हनुमान मंदिरातून चोरट्यांनी दानपेटी पळविल्याची घटना पुन्हा घडली आहे.

भितीचे वातावरण : बजाजनगरातील मंदिरातून दानपेटी पळविलीवाळूज महानगर : वाळूज महानगरात चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. बजाजनगरातील महारुद्र हनुमान मंदिरातून चोरट्यांनी दानपेटी पळविल्याची घटना पुन्हा घडली आहे. या घटनेतील संशयित चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. काही दिवसांच्या अंतराने सतत चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

बजाजनगर येथे तानाजी नगरात महारुद्र हनुमान मंदिर आहे. एकादशी निमित्त रविवारी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत मंदिरात भजनाचा कार्यक्रम सुरु होता. त्यानंतर सर्व मंडळी घरी गेली.

मंदिरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी लाईट बंद करुन मंदिराच्या गाभाºयासमोर ठेवलेली जवळपास ५० किलो वजनाची लोखंडी दानपेटी लंपास केली. दरम्यान, मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास शेजारील आदित्य नांदे हा लघशंकेसाठी उठला असता त्याला मंदिरातील लाईट बंद दिसली.

आदित्यने ही माहिती वडिल बाजीराव नांदे यांना दिली. बाजीराव नांदे यांच्या मनात संशय आल्याने त्यांनी मंदिरात जाऊन पाहाणी केली असता मंदिरातील दानपेटी गायब असल्याचे दिसून आले. यापूर्वीही ही दानपेटी दोनवेळा चोरट्यांनी फोडून आतील रक्कम लंपास केली होती. या दानपेटीत जवळपास १५ हजार रुपये असावेत, असा अंदाज येथील नागरिकांनी व्यक्त केला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद नसल्याचे पोलीसांनी सांगितले.

संशयित चोरटे सीसीटीव्हीत कैदहनुमान मंदिरातील दानपेटी चोरी झाल्याच्या वेळेत एक महिला व अन्य एक व्यक्ती असे दोघेजण मंदिराच्या दिशेने जात असताना मंदिरासमोरील एका झेरॉक्स दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सदर व्यक्तीच्या हातात लोखंडी रॉडअसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :WalujवाळूजCrime Newsगुन्हेगारी