शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:51 IST

नांदेड: दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अभ्यासगट, त्यांनी सुचविलेल्या शिफारशी, शाळांकडून घेण्यात येणारी दक्षता अन् शासनाची भूमिका याचा आतापर्र्यंत गांभीर्याने विचारच करण्यात आला नाही़

शिवराज बिचेवार । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अभ्यासगट, त्यांनी सुचविलेल्या शिफारशी, शाळांकडून घेण्यात येणारी दक्षता अन् शासनाची भूमिका याचा आतापर्र्यंत गांभीर्याने विचारच करण्यात आला नाही़ त्यामुळे दप्तराचे ओझे वाहणाऱ्या अनेक चिमुकल्यांना मणक्यांचे आजार जडले आहेत़ याबाबत गुजराती हायस्कूलने पुढाकार घेत दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी दररोजसाठी वेळापत्रकच निश्चित केले आहे़ ३० वर्गांमध्ये जवळपास दोन हजार विद्यार्थी असलेल्या या शाळेने प्रत्येक दिवसाचे अन् विषयाचे काटेकोर नियोजन केले आहे़ पूर्वी सर्वच विद्यार्थी सर्वच विषयांची पुस्तके, वह्या सोबत आणत होते़ त्यावर तोडगा काढत, सर्व विषयांच्या पुस्तकांची सम विभागणी केली़ साधारणत: एका बाकावर तीन विद्यार्थी बसतात़ बैठकव्यवस्थेनुसार डाव्या बाजूने बाकावरच्या विद्यार्थ्यांना १ ते ३ असा क्रम देण्यात आला आहे़ त्यामुळे मराठीच्या तासासाठी त्या बाकावरील एकाच विद्यार्थ्याने त्या विषयाचे पुस्तक आणायचे आणि बाकावरील तीनही विद्यार्थ्यांनी त्याच पुस्तकावर लक्ष केंद्रित करायचे़ यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना सर्वच विषयांची पुस्तके आणण्याची गरज नाही़ त्याचबरोबर तुझं-माझं ही भावना जाऊन त्याजागी आपले पुस्तक ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यास सुरुवात झाली़ विषय शिक्षकांना नेमून दिलेल्या दिवसानुसारच वर्गपाठ व गृहपाठ मागविले़त्यामुळे एकाच दिवशी सर्वच विषयांच्या गृहपाठ व वर्गपाठाच्या वह्या आणण्याची गरज राहिली नाही़ निश्चित केलेल्या वह्यासोबत विद्यार्थ्यांना एक रफ वही सोबत ठेवण्यास सांगण्यात आले आहे़ वर्गात शिक्षकांनी शिकविलेला विषय रफ वहीत घेतल्यानंतर घरी जाऊन तो पुन्हा त्याच विषयाच्या वहीत उतरविण्यात येत आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे रिव्हिजन होत असून वह्या आणि पुस्तकेही चांगली राहत आहेत़ शाळेतच आरओचे पाणी असल्यामुळे घरुन येताना विद्यार्थ्यांनी बाटलीमध्ये मोजकेच पाणी आणावे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत़ या सर्व उपाययोजनांमुळे साधारणत: दप्तराचे ओझे दोन ते तीन किलोंने घटले आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलले़ सर्वच शाळांनी याप्रकारे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे़