शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आईच्याच डोक्यावर मुलांच्या अभ्यासाचे ओझे

By admin | Updated: June 26, 2014 00:34 IST

बीड : कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची मर्जी सांभाळताना थकून जाणाऱ्या आईच्या डोक्यावर मुलांच्या अभ्यासाचेही ओझे असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

बीड : कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची मर्जी सांभाळताना थकून जाणाऱ्या आईच्या डोक्यावर मुलांच्या अभ्यासाचेही ओझे असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुलांच्या अभ्यासाकडे वडिलांकडून जास्त लक्ष दिले जात नसल्याचेही या सर्वेक्षणात आढळून आले आहे. पुरुषांच्या बरोबरीने नोकरी करणाऱ्या महिलांच मुलांच्या अभ्यासाची जास्त जबाबदारी पेलत असल्याचे यातून स्पष्ट होते.सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना मुलांसाठी वेळ देणे कठीण झाले आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मुलांबरोबर त्यांच्या पालकांचीही कसरत होत आहे, असे ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात दिसून आले. घरात वडिलांना पूर्ण वेळ देता येत नसल्यामुळे आपल्या पाल्याची जबाबदारी नकळत आईवर येऊन पडते. मुलांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून प्रत्येक पालक प्रयत्नशील असतो. त्यामुळे शाळेतील शिक्षणाव्यतिरिक्त खासगी शिकवणीही लावली जाते. तसेच अनेक आई-वडील मुलांचा घरीही अभ्यास घेतात. मात्र, पालक म्हणून ही दोघांचीही समान जबाबदारी असताना मुलांच्या संगोपनाबरोबरच त्यांच्या शिक्षणाकडेही आईलाच लक्ष द्यावे लागते. त्यांचा गृहपाठ करून घेणे, त्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी ती प्रयत्न करीत असते. परंतु, काही वेळा बदलत्या अभ्यासक्रमामुळे मुलांच्या अभ्यासातील अडचणी सोडवणे पालकांना कठीण जाते. त्यामुळे पालक खासगी शिकवण्या लावण्याला प्राधान्य देतात. सर्वेक्षणामध्ये तब्बल ३० टक्के मुलांच्या बाबतीत असे आढळून आले, की मुलांचे आई-वडील नोकरी करतात. तर, ४३ टक्के मुलांचा अभ्यासही आईला घ्यावा लागतो. मुलांचा अभ्यास घेण्यात केवळ ३७ टक्के वडील सक्रिय असल्याचे समोर आले आहे. दोघेही मिळून अभ्यास घेणाऱ्या पालकांची टक्केवारी १३ टक्के आहे. सर्वेक्षणामध्ये सुमारे ७ मुलांचा अभ्यास घरी कोणीही घेत नसल्याचेही दिसून आले. या मुलांना शाळा आणि खासगी शिकवणीमध्ये घेतल्या जाणाऱ्या अभ्यासावरच अवलंबून राहावे लागते.(प्रतिनिधी)अभ्यासातच गुरफटताहेत मुलेशाळेबरोबरच आता मुलांना शिकवणीसाठीही वेळ द्यावा लागतो. म्हणून त्यांचे दैनंदिन जीवन व्यस्त झाले आहे. शाळेमध्ये मुले साधारणत: पाच ते सहा तास असतात. खासगी शिकवण्या या एका तासापासून अडीच तासांपर्यंत घेतल्या जातात. सर्वेक्षणानुसार ५९ टक्के पालकांनी आपल्या मुलांसाठी दोन ते अडीच तास वेळ असलेली शिकवणी निवडली आहे.४१ टक्के मुले एक ते दीड तासापर्यंतच्या शिकवणीला जातात.यातील बहुतेकांचा घरीही अभ्यास घेतला जातो. याचा अर्थ शाळा, खासगी शिकवणी आणि घरी घेतल्या जाणाऱ्या अभ्यासात मुले पूर्णपणे गुरफटून गेली आहेत की काय? असा प्रश्न पडतो.