शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पायात घुंगरू बांधले, आता नाचावे तर लागेलच..!

By admin | Updated: August 26, 2015 23:53 IST

गजानन वानखडे , जालना पायात घुंगरु बांधले आहेत, आता नाचावे तर लागेलच, असे उद्गार पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे उमेदवार कवी

गजानन वानखडे , जालनापायात घुंगरु बांधले आहेत, आता नाचावे तर लागेलच, असे उद्गार पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे उमेदवार कवी विठ्ठल वाघ यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.कवीवर्य विठ्ठल वाघ यांनी कवी जयराम खेडेकर यांच्या उर्मीच्या कार्यालयास सोमवारी भेट दिली. साहित्य संमेलनाचे आपण अध्यक्ष व्हावे, अशी मित्रमंडळीनी आग्रह केल्यानेच आपण अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे वाघ म्हणाले. यापूर्वी नाशिक येथे झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माझे मित्र दिवंगत केशव मेश्राम यांच्यासाठी माघार घेतली होती. परंतु ज्या क्षेत्रात आपण एवढ्या वर्षांपासून काम करत आहोत. त्यात काही करण्यासाठी आपण का मागे राहावे, असेही मला वाटते. एक व्यासपीठ मिळवून नव्या पिढीशी त्या निमित्ताने संवाद साधता येणार असल्याने आपल्याला आनंद आहे. ना नफा ना तोटा तत्वावर आपले विचार वाचकांपर्यंत पोहोचविण्यास उत्सूक असल्याचे वाघ म्हणाले.पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात दाभोलकर, पानसरेंची हत्या होते. त्यामुळे एकाअर्थी धर्म विवेकाचा मारेकरी ठरतो. अंधश्रध्देचा निर्माता ठरत आहेत. त्यामुळे नव्या पिढीने अशा अंधश्रध्देपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणतात सोन्याची असते व्दारका पोथ्या पुराने सांगत असतात. ऐकणाऱ्याच्या घरात मात्र लाकडाचेही खांब नसतात.पुराणातली वांगी चिरून भाजी कधी शिजत नाही. वरूणाचा धावा करून धरती कधी विझत नाही. कथा कीर्र्तनातून कदा अमृताची ओतता साय.घोटभर पाण्यासाठी वणवण भटके माझी माय. अमृताचे खरे नाही. सत्य फक्त पाणी आहे. एवढे ज्याला कळले. तोच वैदात्याहून ज्ञानी आहे.असे मत व्यक्त केले. वाघ यांनी युवकांसाठी प्रेरणादायी कवीता म्हटली. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळावर काम करत असताना लोकबोलीचे जतन व्हावे, या हेतूने तीन कोष तयार केले. एक वऱ्हाड मराठी बोलीचा शब्दकोष, यात वीस हजार शब्द आहेत, दुसरे मराठी म्हणीचा शब्दकोश १४ हजार म्हणी, वऱ्हाडी बोलीचा वाक्प्रचार कोष, असे तयार केले आहेत. फुले, शाहू आंबेडकर, संत तुकाराम, संत चोखामेळा आदी मंडळीनी जे आपल्या साहित्यातून सतत इतरांना जगण्याची उमेद दिली. त्यांच्यासारखे कार्य करण्याची गरज आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी लेखक कविंनी आपली लेखनी झिजवावी. अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलन परदेशात होतात याबद्दल वाघ म्हणतात की, जर जगभर मराठी जात असेल तर त्याला काय हरकत आहे. पण त्याची फलनिष्पत्ती काय. कोणतेही संमेलन घेण्याचा एक विचार असतो. तो साध्य होतो काय, तो विचार पुढे जात आहे काय, याची तपासणी होणे गरजेचे आहे. जगभरात मराठी पोहचविण्याचे काम विश्व मराठी साहित्य संमेलन करत आहे. परंतु ते कौटुंबिक साहित्य होऊ नये ही अपेक्षा आहे.