शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

जिंतूरमध्ये पुन्हा बोर्डीकरविरुद्ध भांबळे ?

By admin | Updated: June 12, 2014 00:13 IST

शिवसेनेचा उमेदवार अजूनही गुलदस्त्यात: अपक्षांचीही गर्दी असणार

विजय चोरडिया ल्ल जिंतूरजिंतूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आ. रामप्रसाद बोर्डीकर निवडणूक रिंगणात उतरणार हे निश्चित असले तरी ते पक्षातर्फे निवडणूक लढवितात की अपक्ष,अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे. यावेळी शिवसेनेच्या गोटात उमेदवारीविषयी शांतता आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे राष्ट्रवादीचे विजय भांबळे हे काय खेळी खेळतात, याकडेही लक्ष लागले आहे.गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसचे रामप्रसाद बोर्डीकर यांना या मतदारसंघात संघर्ष करावा लागत आहे. २००४ साली त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली तरी गेल्या निवडणुकीत मात्र काँगे्रसचे उमेदवार म्हणून लढताना शेवटपर्यंत विजयासाठी संघर्ष करावा लागला आणि अवघ्या १२२५ मतांनी ते विजयी झाले. अपक्ष म्हणून विजय भांबळे यांनी त्यांना जोरदार लढत दिली होती. २००४ मध्येही विजय भांबळे हे बसपाच्या तिकिटावर रिंगणात उतरले होते. परंतु, पराभव झाला. गेल्यावेळेस अपक्ष म्हणून ते विजयाच्या समीप पोहोचले होते. परंतु, नशिबाने बोर्डीकरांना साथ दिली. यावेळीही विजय भांबळे हे पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरण्याची चिन्हे असून त्या दृष्टीने त्यांची जोरात तयारी चालू असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातील माजी आमदार कुंडलिक नागरे यांच्या नावाचीही चर्चा असली तरी ते परभणीतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बोर्डीकर हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार अशी चर्चा त्यांच्याच गोटातून कार्यकर्ते करीत आहेत. परंतु, अधिकृत दुजोरा मिळाला नाही. जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर काँग्रेसचे दावेदार म्हणून कुंडलिक नागरे हे पर्याय ठरु शकतात. परंतु, नागरे यांची इच्छा सध्यातरी जिंतूर लढविण्याची नाही, अशी चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी शिवसेनेकडून ही निवडणूक लढविली होती. गेल्या काही दिवसांच्या त्यांच्या हालचाली पाहता त्यांचा प्रयत्न पाथरीेमधून रिंगणात उतरण्याचा आहे. असे झाले तर या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार कोण, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या मतदारसंघात जिंतूर आणि सेलू तालुक्याचा समावेश आहे. सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे ही काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मध्यंतरी त्यांचे बंधू मुकेश बोराडे यांचे नाव चर्चेत होते. दोघांपैकी एक जण रिंगणात उतरेल, असा कयास आहे. जिंतूरचे माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी गेल्या एक वर्षापासून केली आहे. त्यांचा पक्ष कोणता हे आजतरी निश्चित नाही. या मतदारसंघात बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आयरामप्रसाद बोर्डीकर७६४२७अपक्ष विजय भांबळे७५२०२शिवसेनाहरिभाऊ लहाने३०५७६ इच्छुकांचे नाव पक्षरामप्रसाद बोर्डीकर काँग्रेसविजय भांबळेराष्ट्रवादीकुंडलिक नागरेकाँग्रेसप्रताप देशमुख----विनोद बोराडेकाँग्रेसलोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव यांना ४८५ एवढे मताधिक्य