शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामांवरील बंदी उठविली

By admin | Updated: September 2, 2014 01:56 IST

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने दीड महिन्यापूर्वी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरालगतच्या ३२ गावांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बांधकामांना मनाई केली होती

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने दीड महिन्यापूर्वी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरालगतच्या ३२ गावांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बांधकामांना मनाई केली होती. मात्र, आता समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी ही बंदी उठविली असल्याचे तहसीलदार विजय राऊत यांनी आज सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा संपूर्ण जून महिना कोरडा गेला. परिणामी पाणीटंचाईची भीषणता वाढली होती. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी १५ जुलै रोजी काही उपाययोजना केल्या होत्या. त्यात पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या हेतूने शहरालगतच्या ३२ गावांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बांधकामांना मनाई करण्यात आली होती. सातारा, देवळाई, वडगाव कोल्हाटी, वरूड काझी, करमाड, कुंभेफळ, लाडगाव, झाल्टा, निपाणी, गांधेली, नायगाव, जटवाडा इ. गावांमध्ये ही मनाई करण्यात आली होती. त्याच्या अंमलबजावणीसाठी तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली पथकाची स्थापनाही करण्यात आली होती. आता जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दीड महिन्यानंतर ही बंदी उठविली आहे. त्यामुळे नागरिकांना चांगला दिलासा मिळाला आहे.जायकवाडी धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी १५ जुलै रोजी उद्योगांच्या पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार उद्योगांच्या पाणीपुरवठ्यात सरासरी २० टक्के कपात करण्यात आली होती. मात्र, आता जायकवाडी धरणातही सुमारे २४ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे बांधकाम बंदीप्रमाणेच उद्योगांची पाणी कपातही मागे घेतली असल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. बांधकाम बंदीच्या आदेशानंतर तहसीलच्या पथकाने काही दिवस संबंधित गावांचे दौरे केले. या दरम्यान, सुरू असलेल्या बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या. ३२ गावांमध्ये अशा ७२ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. दंड किंवा गुन्हे दाखल करण्याची कारवाई मात्र, कोणावरही करण्यात आली नाही. विशेष म्हणजे वरील सर्व गावांमध्ये बंदीनंतरही बिनधास्तपणे बांधकामे सुरूच होती.