शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
4
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
5
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
6
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
7
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
8
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
9
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
10
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
11
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
12
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
14
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
15
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
16
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
17
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
18
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
19
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
20
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

छतावर वीज बनवा आणि विका

By admin | Updated: June 24, 2016 01:32 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद सौरऊर्जेच्या माध्यमातून घराच्या छतावरच ऊर्जा निर्मिती प्रकल्प साकारण्याची योजना महावितरणने आणली आहे. तुम्ही निर्माण केलेली आणि वापरानंतर उरलेली

सुनील कच्छवे , औरंगाबादसौरऊर्जेच्या माध्यमातून घराच्या छतावरच ऊर्जा निर्मिती प्रकल्प साकारण्याची योजना महावितरणने आणली आहे. तुम्ही निर्माण केलेली आणि वापरानंतर उरलेली वीज महावितरण विकत घेणार आहे. शहरात या योजनेस प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत शहरातील बारा जणांनी तसा प्रकल्प उभारून महावितरणकडे त्याची नोंदणी केली आहे. राज्यात सौरऊर्जा निर्मितीची परवानगी आतापर्यंत मोठ्या उद्योजकांनाच होती. मात्र आता निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक वसाहती आणि हाऊसिंग सोसायट्यांना छतावर वीज निर्मिती करता येत आहे. महावितरणने त्याबाबत काही महिन्यांपूर्वीच नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार नागरिकांना त्यांच्या वापरानंतर वाचलेली वीज महावितरणला विकता येणार आहे. महावितरणच्या धोरणानुसार सिंगल फेस ग्राहक आठ किलोवॅट, थ्री फेज ग्राहक १५० किलोवॅट वीज निर्माण करूशकतो. मनपा हद्दीतील ग्राहक १५० किलोवॅट ते १ मेगावॅट वीज निर्माण करू शकतात. मनपा हद्दीबाहेरील ग्राहक ८० किलोवॅट ते १ मेगावॅट वीज निर्माण करू शकतात. न वापरलेली वीज नेटमीटरिंगद्वारे महावितरणला विकत देता येणार आहे. याविषयी महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, महावितरणच्या या योजनेला शहरात प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. याअंतर्गत आतापर्यंत शहरात सिंगल फेजच्या सात आणि थ्री फेजच्या पाच ग्राहकांनी महावितरणकडे नोंदणी केली असून, त्यांनी छतावर सौरऊर्जा निर्मिती सुरू केली आहे. यामध्ये चंद्रशेखर चौधरी, रामचंद्र रत्नपारखे, किशोर सोनवणे, राजीव मुंदडा, ऋषिकेश धर्माधिकारी, अरविंद ढोबले, गोपाल नावंदर तसेच राज आॅटो, विनोद तोतला, मिलिंद वाघ, गिरवारसिंग सुखमनी, केदार पानसे यांचा समावेश आहे. विजेची देवाण- घेवाण नेटमीटरिंगद्वारे सध्या शहरात बारा जणांकडून ऊर्जानिर्मिती होत आहे. परंतु तूर्तास त्यांच्याकडे निर्माण होणारी वीज ही त्यांचीच गरज भागविण्याइतकी आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांच्याकडून महावितरणला वीज विकत मिळत नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या बारा ग्राहकांकडे महावितरणचे वीज कनेक्शन आहे. त्यालाच नेटमीटर बसविण्यात आलेले आहे. तसेच सौरऊर्जा प्रकल्पाचे कनेक्शनही जोडण्यात आलेले आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांना जेव्हा सौरऊर्जेपासूनची वीज मिळत नसेल तेव्हा महावितरणच्या पोलवरून वीज मिळते.