शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खैरेंची विकासकामे बोगसच; पण एसईच्या अहवालानंतर संबंधितांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:07 IST

खा. चंद्रकांत खैरे यांच्या खासदार निधीतील कामे बोगस झाल्याच्या आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या तक्रारीत तथ्य आढळून येत असले तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांच्या अहवालानंतर संबंधितांवरची कारवाई अपेक्षित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खा. चंद्रकांत खैरे यांच्या खासदार निधीतील कामे बोगस झाल्याच्या आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या तक्रारीत तथ्य आढळून येत असले तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांच्या अहवालानंतर संबंधितांवरची कारवाई अपेक्षित आहे. हे अधीक्षक अभियंता काय अहवाल देतात, किती दिवसांत देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.कन्नड तालुक्यातील देभेगाव व आलापूरमधील १५ पैकी ९ कामे झालीच नसल्याचे कन्नडचे उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकर यांनी जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले की, चौकशी अहवालानुसार कामांमध्ये अनियमितता आढळून आलेली आहे. काही कामे झालेलीच नाहीत. त्यामुळे संबंधित अधिकाºयांवर कारवाई केली जाईल. तसेच बांधकाम विभागाची जी कामे झाली नाहीत, त्याबाबत अधीक्षक अभियंत्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. तीन दिवसांत हा अहवाल यायला पाहिजे. त्यानंतर संबंधित विभागाच्या सचिवांनादेखील अहवाल पाठविला जाईल आणि दोषी अधिकाºयांवर कारवाई केली जाईल.आ. हर्षवर्धन जाधव यांनी खा. चंद्रकांत खैरे यांच्यावर बोगस कामे केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी कन्नडच्या उपविभागीय अधिकाºयांमार्फत दोन गावांतील कामांची चौकशी करून घेतली. नुकताच चौकशीचा अहवाल प्राप्त झाला आणि एकच खळबळ उडाली. देभेगावात तीन कामे झाली नसल्याचे उघड झाले. प्रत्येक कामात नमूद संरक्षक भिंत, पेव्हर ब्लॉक करण्यात आले नसल्याचे आढळून आले आहे.देभेगावच्या जि. प. शाळेच्या संरक्षक भिंतीचे काम १५ वर्षांपूर्वी झाले होते, असे मुख्याध्यापक व गावकºयांनी सांगितले. तेथील गुरुद्वारालगतच्या संरक्षक भिंतीचे काम गुरुद्वारा ट्रस्टमार्फत झाले. राजकीयदृष्ट्या या बोगस कामांच्या प्रकरणाला कसे वळण मिळते हे पाहणेही आता औत्सुक्याचे ठरणार आहे.