जालना : नगर परिषदेच्या वतीने २०१७- २०१८ च्या १७० कोटी २८ लाख ९० हजार रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जालना नगर पालिकेत नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी स्थायी समितीच्या सभापती व सदस्यांची बैठक झाली. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, सार्वजनिक बांधकाम सभापती महावीर ढक्का, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण सभापती आरेफखाँ अफजल खान, स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती मोहंमद नजीब लोहार, शिक्षण सभापती आशा ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती अन्सारी फरहाना अब्दुल रऊफ, स्थायी समितीचे सदस्य अनिता वाघमारे, भास्कर दानवे, विष्णू पाचफुले आदींची उपस्थिती होती.या बैठकीत नगर पालिकेने २०१७- २०१८ मध्ये पालिकेला मिळणारे उत्पन्न व होणारा खर्च या दोन्ही बाजू ग्राह्य धरून एकूण १७० कोटी २८ लाख ९० हजार रूपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावर स्थायी समितीच्या सभापती व सदस्यांनी चर्चा करून अर्थसंकल्प मंजुरीबाबतचे सर्व निर्णय नगराध्यक्षा गोरंट्याल यांनीच घ्यावेत, असा ठराव घेण्यात आला. (प्रतिनिधी)
१७० कोटींचे अंदाजपत्रक मंजूर
By admin | Updated: January 14, 2017 00:30 IST