उस्मानाबाद : हगदारीमुक्तीसाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असले तरी अद्यापही जिल्ह्यातील १ लाख ७१ हजार ९११ कुटुुंबांकडे शौचालय नसल्याचे विदारक चित्र पुढे आले आहे. जिल्ह्यात ६२२ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यात ग्रामीण भागात २ लाख ८० हजार ५०८ कुटुंब पैकी ८६ हजार ५५३ कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालये असून, १ लाख ९३ हजार ९५५ कुटुंबाकडे अद्यापही वैयक्तिक शौचालये नाहीत. जिल्ह्याची एकुण लोकसंख्या १४ लाख ८६ हजार ५८६ असून यात पुरुष लोकसंख्या ७ लाख ६९ हजार ३६८ तर स्त्रिया ७ लाख १७ हजार २१८ इतकी आहे. यात ग्रामीण भागातील लोकसंख्या १२ लाख ५३ हजार ३३० तर शहरी भागातील २ लाख ३३ हजार २५६ आहे. निर्मल भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या व असलेल्या कुटुंबाचा सर्व्हे करण्यात आला असता, त्यावेळी १ लाख ९३ हजार ९५५ कुटुंबाकडे शौचालये नसल्याचे पुढे आले होते. म्हणजेच जिल्ह्यात केवळ ३०.८६ टक्के कुटुंबाकडे शौचालय आहेत. दरम्यान २०१३-१४ मध्ये आठ तालुक्यातील विविध गावात १९ हजार ४१८ शौचालये बांधण्यात आली असून, जुलै अखेर २ हजार ६१६ शौचालय निर्मल भारत अभियानांतर्गत बांधण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)दारिद्रय रेषेखालील सर्व कुटुंबे व दारिद्रय रेषेवरील अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, लहान आणि अल्पभूधारक शेतकरी, भुमीहीन शेतमजूर, शारीरीक दृष्टया अपंग आणि महिला कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे यांना वैयक्तिक स्वच्छतागृह बांधून वापर सुरु केल्यास ४ हजार ६०० रुपयांचे अनुदान देण्यात येते. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना एकत्रीकरणांतर्गत वैयक्तीक शौचालय बांधण्यास १० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येते.४ग्रामीण भागात शौचालय बांधण्यासाठी विविध कार्यक्रम राबवुन व जनजागूती करुन ग्रामस्थांना प्रोत्साहीत करण्यात येत आहे. यासाठी निर्मल भारत अभियानांच्या वतीने पदाधिकारी, सरपंच, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांच्या वारंवार बैठक घेऊन लोकांना शौचालयांचे महत्त्व सांगण्यात येत आहे. तसेच १५ आॅगस्ट पासून ग्रामीण भागात शौचालय बांधण्यासाठी आणखी एक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे यांनी सांगितले.
बसपाचा हिंगोलीत मोर्चा
By admin | Updated: August 13, 2014 00:26 IST