शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
3
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
4
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
5
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
6
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
7
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
8
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
9
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
10
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
11
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
12
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
13
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
14
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
15
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
16
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
17
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
18
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
19
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
20
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
Daily Top 2Weekly Top 5

तुटलेले गेट अन् ढासळलेल्या भिंती !

By admin | Updated: July 14, 2014 01:01 IST

ेउस्मानाबाद : जिल्हा परिषद शाळांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. मागील तीस-चाळीस वर्षापूर्वी उभारलेल्या शाळांच्या इमारतींची अवस्था अत्यंत खराब झाली आहे.

ेउस्मानाबाद : जिल्हा परिषद शाळांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. मागील तीस-चाळीस वर्षापूर्वी उभारलेल्या शाळांच्या इमारतींची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्याहीपेक्षा अनेक शाळांना संरक्षक भिंतीच राहिलेल्या नाहीत. तर काही सरंक्षक भिंतींची जागोजागी पडझड झाली आहे. असे असतानाच आठ-दहा वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या काही शाळांना तर संरक्षक भिंतीच बांधण्यात आलेल्या नाहीत. ज्या शाळांच्या संरक्षक भिंती चांगल्या स्थितीत आहेत, त्यांच्या गेटची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अशा शाळांच्या संरक्षक भिंतीच्या बाबतीत विद्यार्थ्यांसोबतच गुरूजनांनाही ‘असून अडचण, नसून खोळंबा’ या म्हणीचा प्रत्यय येत आहे. संरक्षक भिंतीच्या अशा स्थितीमुळे शाळेच्या आजूबाजूला वास्तव्यास असणारे काही नागरिक शाळा परिसरातच प्रातर्विधी उरकत आहेत. तर काही शाळांचे मैदान हे जनावरांसाठी कुरण बनले आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यातबालाजी आडसूळ ल्ल कळंबतालुक्यातील कन्हेरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत रस्त्याच्या कडेला आहे. त्यामुळे परिसरात वाहनांची सततच वर्दळ असते. असे असतानाही शाळेच्या सभोवताली संरक्षक भिंत बांधण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत आणि शाळेबाहेरही जीव मुठीत धरुन वावरावे लागते. कन्हेरवाडी येथे जि.प. ची पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. २४३ विद्यार्थी संख्या आहे. ही शाळा वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला आहे. गावातील अंतर्गत वाहतुकीसह कळंब, मांडवा, वाशी आदी ठिकाणी जाणारी वाहनेही याच रस्त्यावरुन वाहतात. असे असतानाही सदरील शाळेला आजवर संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नाही. खूप वर्षापूर्वी तारेचे कुंपण लावण्यात आले होते. मात्र आजघडीला तेही नावालाच आहे. शाळा सुटल्यानंतर मुले धावत सुटतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. गतवर्षी एका विद्यार्थ्याच्या बाबतीत असा प्रकार घडला होता. मुख्याध्यापकासह ९ शिक्षक कार्यरत आहेत. शाळेमध्ये आवश्यक शिक्षक, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालयाची सुविधा असल्या तरी चार वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. दगडी बांधकामाला अनेक वर्षाचा कालावधी लोटला आहे. भिंतीवर व छताचे प्लास्टर निखळून पडत आहेत. दारे, खिडक्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. संरक्षक भिंतीची गरजसंतोष मगर ल्ल तामलवाडीतुळजापूर तालुक्यातील गोेंधळवाडी येथील शाळेसाठी अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुसज्ज इमारत मिळाली. मात्र संरक्षक भिंतीची प्रतीक्षा कायम आहे. संरक्षक भिंत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून गोंधळवाडी शाळेसाठी इमारत उभारली. लाखो रुपये खर्च करुन ७ वर्गखोल्या बांधण्यात आल्या. त्या इमारतीत वर्षभरापासून शाळा सुरु आहे. येथे पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून, १७१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इमारत झाली. पण संरक्षक भिंत नसल्याने शाळा बंद काळात मोकाट जनावरांचा सुळसुळाट होतो. तर अन्य व्यक्तींकडून शाळेच्या दरवाजे, खिडक्यांची नासधूस करण्याचे प्रकार सुरु आहेत. त्यामुळे इमारतीची सुरक्षितता धोक्यात आली आहे. शाळेसमोर रोपांची लागवड केली. पण जनावरांचा वावर वाढल्याने रोपे टिकून राहत नाहीत. या नव्याने बांधलेल्या इमारतीसाठी जि. प. ने निधी मंजूर करावा, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोपट मोटे यांनी केली आहे.चौथीची शाळा आठवीपर्यंतगोंधळवाडी या खेडेगावात पूर्वी चौथीपर्यंत शाळा होती. पाचवीपासून शिक्षण घेण्यासाठी येथील मुला-मुलींना ४ कि.मी. अंतर पायी येऊन शिक्षण घ्यावे लागत. नंतर पाचवीचा वर्ग सुरु झाला. यावर्षी ८ वीचा वर्ग सुरु झाला. त्यामुळे अडवळणी गावात आठवीचा वर्ग सुरु झाल्याने येथील विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. त्यामुळे पालकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. नवीन शाळा इमारतीबरोबर आठवीचा वर्ग सुरु झाल्याने येथील शिक्षणाची प्रगती कौतुकास्पद आहे.जागोजागी फरशी उखडलीदत्ता गायके ल्ल येरमाळाकळंब तालुक्यातील रत्नापूर येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ९ वर्ग खोल्या असलेल्या या इमारतीला गळती लागली आहे. पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. १९६० साली चार वर्ग खोल्या बांधण्यात आल्या होत्या. या वर्ग खोल्यांची अवस्था खुराड्याप्रमाणे झाली आहे. काही खोल्यांमध्ये घुशीने खड्डे केले आहेत. त्यामुळे जागोजागी फरशी उखडली आहे. तसेच भिंतीलाही तडे गेले आहेत. त्याचप्रमाणे पत्रेही खराब झाले आहेत. शौचालयाच्या बाबतीत तर विचार न केलेलाच बरा. त्यामुळे विशेषत: महिला आणि विद्यार्थिनींची कुचंबणा होत आहे. शाळेच्या आवारातच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अशा दुर्गंधीयुक्त वातावरणातच बसून विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा आस्वाद घ्यावा लागत आहे. काही वर्ग खोल्यांचे प्लॅस्टर जीर्ण झाले असून, ते अचानक निखळून पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत.कंपाऊंड वॉलचीही ठिकठिकाणी पडझड झाली आहे. त्यामुळे शाळा परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. विद्यार्थ्यांसाठी पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. मात्र टाकीलाही गळती लागल्यामुळे पाणी साठले जात नाही, असे शिक्षण रमेश तवटे यांनी सांगितले. छताच्या पत्र्यांना पडली छिद्रे...ज्ञानेश्वर वाघमारे ल्ल काक्रंबायेथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. मात्र या शाळेला संरक्षक भिंत बांधली नसल्याने मैदानावर विद्यार्थ्यांऐवजी मोकाट जनावरांचाच वावर दिसून येतो. रात्रीच्या वेळी तर तळीरामांची शाळाच भरते. मैदानात सर्वत्र दारुच्या बाटल्या विखुरलेल्या अवस्थेत दिसून येतात. शाळेमध्ये जवळपास ३४० विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. विद्यार्थ्यांसाठी १३ वर्गखेल्यांची सोय आहे. यापैकी एक तांदूळ ठेवण्यासाठी, दुसऱ्या खोलीत प्रयोगाचे साहित्य तर अन्य दोन खोल्यांची दुरवस्था झाली आहे. छतावरील पत्र्यांना जागोजागी छिद्र पडल्यामुळे पावसाळ्यात गळती लागते. तसेच स्लॅबच्या खोल्याही गळतात. त्यामुळे पावसाळ्यामुळे एकेका खोलीमध्ये दोन-दोन वर्गाचे विद्यार्थी बसविण्याची वेळ येथील गुरुजींवर येत आहे. या समस्या कमी आहेत म्हणून की काय संरक्षक भिंतीअभावी शाळेच्या मैदानाचा मोकाट जनावरे कब्जा घेत आहेत. तारेचे कुंपण असून नसल्यासारखे. शाळेच्या पाठीमागील बाजूने कॅनॉल जात आहे. तर समोरील बाजूस विद्युत डीपी, स्मशानभूमी आणि विसर्जन विहीर असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आडोसा म्हणून वापरगोविंद खुरूद ल्ल तुळजापूरशहरामध्ये जिल्हा परिषदेच्या तीन शाळा आहेत. यापैकी जि.प. माध्यमिक (मुलांची) शाळेच्या संरक्षक भिंतीची पडझड झाली आहे. त्यामुळे येथून ये-जा करणारी मंडळी शाळेच्या परिसराचा आडोसा म्हणून वापर करीत आहेत. परिणामी परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे.जि.प.माध्यमिक शाळेची पटसंख्या साडेतीनशेच्या आसपास आहे. २० कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये ८ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र शाळेत समस्या स्वच्छतागृह व शौचालयाची वानवा आहे. त्यामुळे विशेषत: महिला कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतो. परिणामी शाळेच्या पाठीमागील जागेत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्याचप्रमाणे शाळेच्या संरक्षक भिंतीचीही जागोजागी पडझड झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आडोसा म्हणून शाळेच्या मैदानाचा वापर करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुर्गंधीयुक्त वातावरणात ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत. तसेच सायंकाळी वेळी शाळेच्या आजूबाजूला वास्तव्यास असलेले नागरिक भिंतीवरुन उड्या टाकून परिसरात शौचास बसतात.