शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘उज्ज्वल नांदेड’ पॅटर्न इतर जिल्ह्यांसाठी उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 00:21 IST

नांदेड : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य सुविधा मिळाव्यात या धडपडीने जिल्हा प्रशासनाची उज्ज्वल नांदेडच्या माध्यमातून सुरू असलेली

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य सुविधा मिळाव्यात या धडपडीने जिल्हा प्रशासनाची उज्ज्वल नांदेडच्या माध्यमातून सुरू असलेली ज्ञानदानाची सेवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यासाठी आदर्श आहे, असे प्रतिपादन एमपीएससीतील टापर्सने नांदेडातील कार्यक्रमात केले़ जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर मनपा व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महिन्याच्या ५ तारखेला स्पर्धा परीक्षा मार्गर्शन शिबिर घेण्यात येते़ ५ जुलै रोजी आयोजित शिबीरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले एमपीएससी टॉपर्सही विद्यार्थ्यांची गर्दी पाहून भारावून गेले़ शिबीराच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त गणेश देशमुख तर निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांच्यासह प्रमुख मार्गदर्शक प्रा. मनोहर भोळे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत उपजिल्हाधिकारी या पदासाठी महाराष्ट्रातून प्रथम आलेले भूषण अहिरे, द्वितीय आलेले श्रीकांत गायकवाड, पोलीस उपअधीक्षक या पदासाठी खेळाडू प्रवर्गातून प्रथम आलेले सुदर्शन पाटील, नांदेड येथे नुकतेच रुजू झालेले परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले, निवड झालेले पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले, तहसीलदार श्रीकांत निळे पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे मंचावर उपस्थित होते़ विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहून ती पूर्ण होईपर्यंत त्यांचा पाठलाग, कष्ट करुन यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचार घेवून परिश्रम घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी विद्यार्थ्यांनी उज्ज्वल नांदेडला दिलेल्या सहकार्याचे कौतुक करुन जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या हितासाठी सदैव तयार असल्याचे सांगितले.प्रमुख मार्गदर्शक प्रा. मनोहर भोळे यांनी स्पर्धा परीक्षेस सामोरे जाताना कशा पद्धतीने सक्षमपणे सामोरे जावे तसेच याबाबत कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आदीची माहिती दिली़ मेहनतीसोबतच मार्गदर्शन आवश्यक असल्याचे साांगून त्यांनी नजीकच्या काळात होणाऱ्या परीक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी उज्ज्वल नांदेड मोहिमेचे आयोजन, साध्य झालेले यश व पुढील काळातील आयोजनाची माहिती दिली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस अव्वल कारकून मीना सोालपूर यांनी ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ या प्रेरणा गिताने केली. सूत्रसंचलन मुक्तीराम शेळके तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी हुस्से यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रताप सूर्यवंशी, शैलेश झरकर, आरती कोकुलवार, बाळू पावडे, संजय कर्वे, अजय वट्टमवार, कोंडीबा गाडेवाड, रघुवीर श्रीरामवार, लक्ष्मण शेनेवाड, सोपान यनगुलवाड आदींनी सहकार्य केले.