लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील बिंदुसरा पुलाचे भिजत घोंगडे काढण्यासाठी आ. विनायक मेटे यांच्या आग्रहास्तव शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक आयोजित केली होती. या वेळी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी नवीन पुलाच्या कामाचे तात्काळ टेंडर करून काम सुरू करण्याचे आदेश दिले. नवीन पूल हा बंधाºयासह पूल या पध्दतीने उभारण्यात यावा, अशा सूचना दिल्या.या पुलाला मंजुरी मिळाली आहे, सांगितले जात होते परंतु, प्रत्यक्षात या पुलाचे काम सुरु होत नव्हते. या गंभीर प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आ. विनायक मेटे यांच्या विनंतीवरून शुक्रवारी मुंबई येथे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक घेतली. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुमित मलिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव प्रविण परदेशी, बीडचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, बीडचे कार्यकारी अभियंता, व सर्व संबंधित विभागाचे सचिव, नॅशनल हायवे अॅथॉरिटीचे अधिकारी, नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयआरबीचे अधिकारी, शिवसंग्रामचे युवक प्रदेश अध्यक्ष राजेंद्र मस्के, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत बिंदुसरा पुलावरील पुल बांधकामाचे टेंडर तातडीने काढून बांधकाम सुरू करण्याचे आदेश दस्तुरखुद नितीन गडकरी यांनी दिले आहेत.बीड शहरातून जाणारा हा मुख्य पुुल असून आतापर्यंत या पुलाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. ही बाब गांभिर्याने घेण्याची गरज असल्याचे आ. विनायक मेटे यांनी बैठकीत सांगितले. सात दिवसाच्या आत पर्यायी रस्ता दुरूस्त करून तो सुरू करावा, असे आदेश दिले.
बिंदुसरेवर बंधाºयासह पूल- नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:41 IST