शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट फोनच्या आमिषाने 'त्याने' बोगस नियुक्तीपत्रावर केल्या अधिष्ठांतांच्या बनावट सह्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 17:24 IST

घाटी रुग्णालयात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळत बोगस नियुक्तीपत्रावर अधिष्ठातांची बनावट स्वाक्षरी करणा-या एका उच्च शिक्षित आरोपीला आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देघाटी रुग्णालय बोगस नोकरभरती प्रकरण, बनावट स्वाक्षरी करणा-या एका उच्च शिक्षित आरोपीला आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली. पोहालने बोगस नियुक्तीपत्र देऊन १७ जणांकडून लाटले ६८ लाख

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळत बोगस नियुक्तीपत्रावर अधिष्ठातांची बनावट स्वाक्षरी करणा-या एका उच्च शिक्षित आरोपीला आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी बनावट नियुक्तीपत्र तयार करणारा राजेंद्र पोहाल याआधीच पोलिसांच्या ताब्यात आहे.

सुनील बन्सीलाल डोणगांवकर उर्फ गजहास(४३,रा. भीमनगर,भावसिंगपुरा) असे  आरोपीचे नाव आहे. त्याचे शिक्षण एम.एस्सीपर्यंत झालेले आहे. आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार किशोर चंद्रभान देहाडे आणि इतर बारा जणांना घाटीत कनिष्ठ लिपीक आणि शिपाई पदावर नोकरी लावण्याचे अमिष दाखवून राजेंद्र पोहाल याने प्रत्येकी दोन लाख रुपये याप्रमाणे २४ लाख रुपये उकळले. २०१४ मध्ये पैशाचा व्यवहार झाल्यानंतर आरोपीने दोन वर्ष त्यांना फिरवले. नंतर तक्रारदारांसह अन्य लोकांना त्याने बोगस नियुक्तीपत्रे दिली. 

यावेळी त्याने ५० लिपीक आणि ४८ शिपाई पदांची निवड यादी त्यांना दाखविली. नियुक्तीपत्रे खरे असल्याचे भासविण्यासाठी आरोपीने त्यावर अधिष्ठातांच्या सह्या आणि शिक्का मारलेला होता. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी पोहाल यास अटक केली. पोलीस कोठडीत त्याची चौकशी केली असता त्याने तक्रारदारांना दिलेल्या नियुक्तीपत्रावर अधिष्ठातांच्या सह्या सुनील डोणगावकर याने मारल्याची कबुली दिली. त्याच्या जबाबानंतर पोलिसांनी २९आॅक्टोबर रोजी रात्री पोलिसांनी सुनीलला राहत्या घरातून अटक केली. तो उच्चशिक्षित असून त्याला नोकरी नाही. तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. 

डीटीपी सेंटरवर बनवले बोगस नियुक्तीपत्रेपोहाल हा नियमित लक्ष्मीनगरातील एका डीटीपी सेंटरवर ये-जा करीत असे. तेथे त्याची ओळख सुनीलसोबत झाली होती. तेथेच त्याने बोगस नियुक्तीपत्रे तयार केली. या नियुक्तीपत्रावर अधिष्ठातांच्या सह्या करण्याचे काम त्याने आरोपी सुनील याच्याकडून करून घेतल्या. त्यासाठी त्याला पोहालने काही रक्कमही दिली. यासोबतच पोहल याने सुनीलला एक मोबाईल हॅण्डसेट देणार होता. मोबाईलच्या अमिषाने सह्या केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती तपास अधिकारी पोहेकाँ अरूण वाघ यांनी सांगितले.